Raj and Uddhav thackeray 
मुंबई

शिवसेना उचलेकरांचा पक्ष झालाय का? मनसेचा सवाल

चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा, ती पण जनतेच्या पैशांनी? असा प्रश्न विचारला आहे.

दीनानाथ परब

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी विद्युत रोषणाई प्रकल्पावरुन शिवसेनेवर (shivsena) अत्यंत बोचरी टीका केली आहे. त्यांनी शिवसेनेला उचलेकरांचा पक्ष म्हटलं आहे. शिवसेनेने मागे पालिकेतील आपली सत्ता बळकट करण्यासाठी मनसेचे (MNS) मुंबई महापालिकेतील (BMC) सहा नगरसेवक फोडले होते तसेच शिवाजी पार्क भागात मनसेच्या संकल्पनांची शिवसेना कॉपी करत असल्याचा संदीप देशपांडे यांचा आरोप आहे. याच मुद्यावरुन त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा ती पण जनतेच्या पैशांनी? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली व्हावी, यासाठी सुद्धा संदीप देशपांडे सातत्याने आवाज उठवत होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली होती. कालही त्यांनी लोकल खुली करण्याच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करताना उपरोधिक टीकाही केली होती.

"आंदोलन,याचिका, पत्र, विनंती, त्रागा, धमकी, बातमी लावून धरण आणि इतर अनेक उपाय या माध्यमातून लोकल 15 ऑगस्ट ला चालू करण्याची आपण घोषणा केली. असो आपलं अभिनंदन आता आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या 15 ऑगस्ट पासून सोडवाल या साठी याचिका करू का आंदोलन हे ही सांगा" असं त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT