मुंबई

काय चाललंय काय? कोरोना काळातही स्वायत्त महाविद्यालयांकडून नियमबाह्य शुल्क वसूली; मनसेचा उच्च शिक्षणमंत्र्यांना पत्र 

तेजस वाघमारे


मुंबई : विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने मान्यता दिलेली स्वायत्त महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य शुल्क वसूल करत असल्याचे प्रकार उघडकीस आले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) केला आहे. विद्यार्थ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी मनविसेने उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना स्वायत्त महाविद्यालय म्हणून मंजूरी देण्यात आली असून त्यांना अभ्यासक्रम तयार करने तसेच शुल्क आकारण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. या महाविद्यालयांना महाराष्ट्र विद्यापीठ कायदा कलम 122 नुसार स्वायत्ताची परवानगी मिळाली असली तरी त्यांना मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांप्रमाणेच शुल्क आकारण्याची परवानगी असते. मात्र स्वयत्ता प्राप्त महाविद्यालयांनी आवाजवी शुल्क आकारत विद्यार्थ्यांची लूट सुरु केली आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाचे आवाजवी शुल्क देणे जमणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी या स्वायत्ता प्राप्त महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर आणि ऍड. संतोष धोत्रे यांनी सामंत यांच्याकडे केली आहे.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT