MNS MLA Raju Patil criticized administration for MMRDA Dombivli Metro kalyan shil road marathi news  
मुंबई

Dombivli Metro : 'डोंबिवलीकरांच्या कामाची नसलेली मेट्रो...'; आमदार राजू पाटलांची प्रशासनावर सडकून टीका

Dombivli Traffic Update: कल्याण शीळ रोडचे रुंदीकरणचे काम पूर्ण न झाल्याने या मार्गावरील वाहन कोंडीची समस्या सुटलेली नाही.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली, ता. 31 - कल्याण शीळ रोडचे रुंदीकरणचे काम पूर्ण न झाल्याने या मार्गावरील वाहन कोंडीची समस्या सुटलेली नाही. हे कमी की काय त्यात एमएमआरडीएकडून मेट्रोच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हे काम हाती घेतल्याने आधीच अरुंद असलेला हा रस्ता आणखी अरुंद झाल्याने वाहन चालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्येवरून आमदार राजू पाटील यांनी नियोजन शून्य एमएमआरडीए अशी टीका प्रशासनावर केली आहे. तसेच डोंबिवलीकरांसाठी कामाची नसलेली मेट्रो त्यांचीच वाट अडवून बसली आहे अशी एक्स पोस्ट करत डोंबिवलीकरांच्या समस्येला वाचा फोडली आहे.

कल्याण, डोंबिवली पल्याडच्या वाहनचालकांना रस्ते मार्गे ठाणे, मुंबई, नवी मुंबई जायचे असल्यास कल्याण शीळ रोड हा एकमेव मार्ग आहे. वाढते शहरीकरण आणि वाहन चालकांची संख्या पाहता या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली. वाहन कोंडीची ही समस्या सोडवण्यासाठी या मार्गाचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरणचे काम हाती घेण्यात आले. बहुतांश ठिकाणी भूसंपादन प्रक्रिया अडल्याने या मार्गाचे पूर्णपणे रुंदीकरण झाले नाही. परिणामी वाहन चालकांना आज ही वाहन कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात वाहनांचा वेग मंदावत असल्याने, तसेच गटारांची बांधणी झाली नसल्याने रस्त्यावर पाणी साचल्याने या कोंडीत आणखी भर पडते.

यंदा ही पावसाळ्यात वाहन कोंडीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागणार आहे. या मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आल्यानंतर आता मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे रस्त्याच्या मधोमध मेट्रोचे खांब उभारणीचा पाया खोदला जात आहे. यामुळे रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दोन्ही बाजूच्या लेन बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे वाहन कोंडी होत असून पावसाळ्यात ही समस्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावरून आता मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाचे कान ट्विट कर खेचले आहेत.

आमदार पाटील यांचे ट्विट

#नियोजन_शून्य_MMRDA

डोंबिवलीकरांसाठी कामाची नसलेली मेट्रो त्यांचीच वाट अडवून बसली आहे. नुकताच कल्याण-शीळ रस्त्याचे कॉंक्रिटीकरण बऱ्यापैकी पूर्ण झालं आहे. आता त्याच्या मधोमध मेट्रॅासाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू केले आहे. खरंतर कल्याण-तळोजा मेट्रोच्या कामासाठी संपूर्ण भूसंपादन झालं नसताना देखील फक्त कल्याण-शीळ रस्त्यावरच खड्डे खोदण्याचे काम सुरू झालं आहे. मेट्रो आली, काम सुरू झाले, जगाला दिसले व याच काळात लोकसभा निवडणूका पण झाल्या ! आता बस करा की! मी सतत सांगत आहे, की कल्याण-शीळ रस्त्याला पर्यायी रस्त्यांची आवश्यकता आहे.

जोपर्यंत कल्याण-शीळ रस्त्याला पर्यायी रस्ते होत नाहीत तोपर्यंत कल्याण-शीळ रस्त्यावरचे सुरू असलेले कल्याण-तळोजा मेट्रोचे काम बंद करून या प्रकल्पाचे इतर ठिकाणचे काम सुरू करावे व मधल्या काळात या रस्त्यावरचे पलावा पुल, लोढा प्रिमियर, रूणवाल व अनंतम् येथील जंक्शनवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी व नंतर या रस्त्यावरचे काम सुरू करावे. अन्यथा पावसाळयात जनतेला सद्य स्थिती पेक्षा अधिक वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार व त्यांचे प्रचंड हाल होतील. याला सर्वस्वी MMRDA चे ढिसाळ नियोजन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. - मनसे आमदार राजुपाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT