आमदार राजू पाटील  sakal
मुंबई

Manoj Jarange : फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घ्या,जरांगेच्या तब्येतीची दखल घ्या ; मनसे आमदाराची सरकारवर टिका

मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली असून आता जरांगे यांच्या ढासळलेल्या तब्येतीवरून मनसे मतदार राजू पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर टिका केली आहे. "सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन सर्वप्रथम जरांगेच्या तब्येतीची दखल घेणे गरजेचे आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली असून आता जरांगे यांच्या ढासळलेल्या तब्येतीवरून मनसे मतदार राजू पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर टिका केली आहे. "सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन सर्वप्रथम जरांगेच्या तब्येतीची दखल घेणे गरजेचे आहे. सरकारने कोणाच्या जीवाशी खेळू नये" असे ट्विट आमदार पाटील यांनी केले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शासनाने कुणबी प्रमाणत्र देताना सगेसोयऱ्यांचाही समावेश करावा, तसा कायदा मंजूर करावा, मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे अधिवेशन त्वरित घ्यावे, आरक्षण अधिसूचना व मसुद्याची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे 10 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.

अन्न, पाणी व वैद्यकीय उपचारांना त्यांनी नकार दिला आहे. अशक्तपणामुळे त्यांना उठता-बसता येत नाही. तरीही ते उपोषणावर ठाम आहेत. त्यांची तब्येत खूपच ढासळली असल्याचे वृत्त बुधवारी आले आहे. यावर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सरकारच्या भूमिकेवर ट्विटरच्या माध्यमातून टिका केली आहे.

मनसे आमदार राजू पाटील यांचे ट्विट

"मनोज जरांगेंची तब्येत ढासळत चालली आहे, अशावेळी सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन सर्वप्रथम जरांगेच्या तब्येतीची दखल घेणे गरजेचे आहे. कोण चुक व कोण बरोबर हे येणारा काळ ठरवेल परंतु सरकारने कोणाच्याही जीवाशी खेळू नये. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kon Honar Crorepati: आता खेळ बदलणार! 'कोण होणार करोडपती'चे सूत्रसंचालन माधुरी दीक्षित करणार; नव्या प्रवासाविषयी बोलताना म्हणाल्या...

डीएसपी ब्लॅक, स्मिरनॉफसह अनेक ब्रँडना फटका! FSSAIच्या तपासणीत मोठा खुलासा; १८ हजार पेट्या जप्त, कारण काय?

Bhimashankar Temple : श्रावणापासून भीमाशंकर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९.३० पर्यंत दर्शनासाठी खुले

रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्यांसाठी मोठी माहिती! बाहेरचं खाणं किती सुरक्षित? धक्कादायक अहवाल समोर, जेवायला जाण्याआधी 'ही' बातमी वाचाच

"मला फरक पडत नाही तो १५ चा आहे की १८...", Vaibhav Sooryavanshi बद्दल ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली नेमकं काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT