मुंबई

राज ठाकरेंची 'ती' व्हायरल ऑडियो क्लिप तुम्ही ऐकली का ?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज ठाकरे हे कायम आपल्या प्रेझेंटेशनच्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. याचा प्रत्यय आपल्याला लोकसभा निवडणुकांच्या वेळेस आलाय. यानंतर राज ठाकरे निवडणुका लढवणार का इथून सगळे प्रश्न उपस्थित झाले होते. यानंतर राज ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आपले तरुण तडफदार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. अशातच राज ठाकरे आता विधानसभेसाठी प्रचारासाठी काय फंडा वापरतात यावर सगळ्याचं लक्ष होतं. 

राज ठाकरे पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ' सारखं यावेळेस काय करतात यावर तर प्रत्येकाचं लक्ष होतं. राज ठाकरे यांचा प्रचाराचा झंझावात तर सुरूच आहेत. पण वेगळं असं राज ठाकरे काय करतायत याची उत्सुकता सगळ्यांनाच होती.

दरम्यान, राज ठाकरे यानी आता सोशल मिडियाच्या माध्यमातून आता एक ऑडियो क्लिप  शेअर करून मतदारांना साद घातलीये. राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर, यु-ट्यूबवरून आपली ऑडियो क्लिप शेअर किलीये.

काय आहे 'ऑडियो क्लिप'मध्ये 

मनसेला सक्षम विरोधी पक्ष बनवा असं आवाहन राज ठाकरे यांनी सर्व मतदारांना केलंय. दरम्यान, आपण ज्यासाठी 2014 मध्ये वेगळ्या सरकारला निवडून आणलं ते सरकारने आधीपेक्षा जास्त नुकसान केलंय. त्यामुळे आताची वेळ, आताची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे, गाफिल राहू नका असा सावध इशारा देतानाच, तुमचा आवाज विधानसभेत पाठवायची हीच वेळ आहे, असं राज ठाकरे म्हणालेत. 

प्रचार सभांचा धडाका राज ठाकरे यांनी लावलाय. विधानसभेची निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच राज ठाकरे यांनी एक वेगळी मागणी घेत, एक वेगळा नारा देत मतदारांना साद घातली आहे. राज ठाकरे सत्ताधाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलंय. त्यामुळे आता, मतदार राजा राज ठाकरेना विरोधी बाकावर बसवतोय का ? हे पहावं लागेल.

WebTitle : MNS president Raj Thackerays Viral Audio clip 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT