मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल

विराज भागवत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना शनिवारी लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या पाठीवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. काही दिवसांपासून त्यांच्या पाठीला त्रास होत होता. त्यानंतर आज त्यांच्या पाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. काही दिवसांपूर्वी टेनिस खेळताना त्यांच्या पाठीला मुकामार लागला होता. त्यावेळी त्यांच्या हातालाही दुखापत झाली होती. गेले काही दिवस त्यांची पाठ दुखत होती. पाठदुखी थांबावी यासाठी त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध-गोळ्या घेतल्या होत्या, पण त्या औषधांनी त्यांना बरं वाटलं नाही. त्यामुळे अखेर त्यांना शनिवारी सकाळी लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली.

आज राज्यात लॉकडाउन लावायचा की नाही? या संबंधीची सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व पक्षांचे नेतेमंडळी या व्हिडीओ संवादात जॉइन झाले पण राज ठाकरे मात्र या संवादात जॉइन का होऊ शकले नाहीत? याबद्दल चर्चा झाली. तेव्हा राज ठाकरे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

राजापेक्षा प्रधान श्रीमंत! किंग चार्ल्स यांच्यापेक्षा ऋषी सुनक,पत्नी मूर्तींची संपत्ती जास्त

MS Dhoni RCB vs CSK : पराभवानंतर नाराज झालेल्या धोनीनं RCB खेळाडूंशी हस्तांदोलनही नाही केलं?

Amruta Khanvilkar: "आई किंवा बहिणीबरोबर फिरते पण नवऱ्यासोबत का फिरत नाहीस?", चाहतीचा प्रश्न; अमृतानं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

SCROLL FOR NEXT