mns raj thackeray politics mumbai goa highway protest election vote esakal
मुंबई

Raj Thackeray : खळखट्याक'चा राज ठाकरेंच्या मनसेला का फायदा होत नाही?

राज ठाकरेंनी पक्षाचा झेंडा देखील बदलला आहे. त्यांची धरसोड वृत्ती यातून दिसते.

सकाळ वृत्तसेवा

Raj Thackeray : मुंबई- गोवा महामार्गाच्या कामावरून राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन सुरू असून या आंदोलनाच्या टायमिंगवर भाजपाने प्रश्न उपस्थित केले आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी मनसेला या आंदोलनाचा राजकीय फायदा होणार का या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

साम टीव्हीवर रविवारी मनसेच्या आंदोलनाबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेत ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे, ठाकरे गटाचे प्रसाद घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन चव्हाण, मनसेचे योगेश चिले सहभागी झाले होते.

महामार्गाचे काम संथगतीने होत असल्याबाबत चर्चासत्रातही नाराजी व्यक्त करण्यात आली असली तरी मनसेची कार्यपद्धत आणि भवितव्य याबाबत ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. ते काय म्हणालेत हे जाणून घेऊया...

राज ठाकरेंची धरसोड वृत्ती

राज ठाकरेंनी पक्षाचा झेंडा देखील बदलला आहे. त्यांची धरसोड वृत्ती यातून दिसते. राज ठाकरेंचे विधानसभेत १३ आमदार होते. त्यापैकी तीन आमदारांना निलंबित करण्यात आले होते. अबू आझमींनी मराठीत शपथ घेण्याचा आग्रह त्यांनी धरला होता.

या निलंबित आमदारांमध्ये राम कदम, शिशिर शिंदे यांचा समावेश होता. यातील राम कदम आता भाजापात तर शिशिर शिंदे शिवसेनेत परतले आहेत. राज ठाकरेंकडे संघटन कौशल्य कमी दिसते. प्रवीण दरेकरही मनसे सोडून गेले. राज यांच्यासोबत फार काही राहिलेलं नाही.

राज ठाकरे आंदोलन का मागे घेतात?

आंदोलन मागे घ्यावेच लागते. मर्यादित यश मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात गैर नाही. मुंबई- गोवा महामार्गावरून मी देखील प्रवास केला आहे. प्रवासात मनस्तापाचा सामना करावा लागतो, गाडीचा वेग १० ते १२ किलोमीटर ऐवढाच असते.

हे भयंकर आहे. हे एखाद्या रुग्णाच्या जिवावर बेतू शकते हे लक्षात घेतले पाहिजे. सध्याच्या आंदोलनाची पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. एखाद्या कामाला ऐवढी वर्ष लागणे हे दुर्दैवी आहे.

मनसेला राजकीय फायदा होईल का?

सरकारने महामार्गाचे काम तातडीने पूर्ण केले पाहिजे. या आंदोलनातून मनसेला राजकीय फारसा फायदा होईल असे वाटत नाही. मनसेकडे नाशिक महापालिका होती. २०१२ मध्ये नाशिकमधील १२२ पैकी ४० जागा मनसेकडे होत्या.

तर २०१७ मध्ये त्यांच्याकडे पाच ते सहा नगरसेवक होते. २००९ ते १२ या कालावधीत खळखट्याक आंदोलनामुळे मनसेला यश मिळालेही असेल पण ते यश मनसेला टिकवता आले नाही. राजकारणात खळखट्याकचा फायदा होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT