मुंबई

वारं खुप सुटलंय अन् जे सुटलंय ते... सभेपूर्वी मनसेचा आणखी एक टीझर

निनाद कुलकर्णी

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या 12 एप्रिल रोजी ठाण्यामध्ये संध्याकाळी जाहीर सभा पार पडणार आहे. त्यापूर्वी मनसेकडून आणखी एक टीझर रिलीज करण्यात आला आहे. यापूर्वी म्हणजेच 9 एप्रिल रोजी कारारा जबाब मिलेगा #उत्तर सभा अशी टॅग लाईन देत एक टीझर रिलीज करणयात आला होता. त्यानंतर आज पुन्हा एक टीझर रिलीज करण्यात आला असून, यामध्ये ''वारं खुप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलेच आहे'' असा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, उद्याच्या सभेत राज ठाकरे यांची तोफ कुणावर बरसणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंच्या भाषणावर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज ठाकरे उद्याच्या ठाण्यातील सभेतील या सर्व राजकीय प्रतिक्रियांना उत्तर देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज यांच्या या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, या सभेपूर्वीचा आणखी एक टीझर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट केला असून यामध्ये वारं खुप सुटलंय आणि सुटलंय ते आपलंच असल्याचा म्हटलं आहे. यापूर्वी 9 एप्रिल रोजी मनसेकडून एक टीझर रिलीज केला होता, त्यात या टीझरला करारा जवाब मिलेगा#उत्तरसभा असे कॅप्शन देण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT