मुंबई

तुम्ही मंत्रालयात येण्यासाठी याचिका करु की, आंदोलन? मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरु करण्याच्या मागणीसाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आग्रही होते.

दीनानाथ परब

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांनी काल रात्री राज्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी येत्या १५ ऑगस्टपासून म्हणजेच स्वातंत्र्यदिनापासून लसीचे दोन डोस (Vaccine two doses) घेतलेल्यांसाठी लोकल प्रवास (Local journey) खुला होणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे भाजपा (Bjp) आणि मनसेने स्वागत करताना टोलाही लगावला आहे. कारण मनसे आणि भाजपाने लोकल प्रवास खुला करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.

भाजपाने रेल्वे स्थानकात आंदोलनही केले होते. राजकीय पक्ष आणि जनतेच्या मागणीमुळे अखेर उद्धव ठाकरेंना लोकल प्रवास खुला करण्याची घोषणा करावी लागली आहे. ही सुविधा फक्त दोन डोस घेतलेल्यांसाठी आणि त्याला १४ दिवस पूर्ण झालेल्यांसाठीच उपलब्ध असेल. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही पद्धतीचे पास मिळवून देण्याची सुविधा असणार आहे, असे उद्धव यांनी सांगितले.

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास सुरु करण्याच्या मागणीसाठी सातत्याने आग्रही असणारे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतानाच टोलाही लगावला आहे. मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे. त्याच मुद्यावरुन त्यांनी "आता आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या 15 ऑगस्ट पासून सोडवाल या साठी याचिका करू का आंदोलन हे ही सांगा" असे उपरोधिकपणे म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘ज्ञानेश कुमार यांचा तात्काळ राजीनामा घ्या’; SIR वरून अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप

Asian Games 2026 : अफगाणिस्तान, मलेशिया यांचा विजय; टीम इंडियाला उपांत्यपूर्व फेरीत कोण भिडणार? जाणून घ्या समीकरण

पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत भिंगार बंदची हाक

Latest Marathi News Live Update : निटचा निकाल जाहीर

Mirkarwada Jetty Cleanup : विनावापर नौकांच्या केबिन हटवल्या मिरकरवाड्यात धडक कारवाई; जेटींनी घेतला मोकळा श्वास

SCROLL FOR NEXT