मुंबई

रिक्षा चालकांच्या मदतीला धावली मनसे वाहतुक सेना

मनसेंच्या वाहतुक शाखांमधून निशुल्क नोंदणी सुरू

प्रशांत कांबळे ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई: निव्वळ प्रवासी वाहतुकीच्या भरवशावर पोटाची खळगी भरणाऱ्या रिक्षा चालकांचा व्यवसाय गेल्या एक वर्षापासून ठप्प पडला आहे. दोनच प्रवाशांच्या वाहतुकीला परवानगी असल्याने, दिवसभरातील उदरनिर्वाहाची सोय करणे सुद्धा कठीण झाले आहे. अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या रिक्षा चालकांना (auto rikshaw unioun) आता १५०० रुपयांचे अर्थसहाय्य मिळविण्यासाठी सुद्धा धडपडावे लागत आहे. मात्र, मुंबई आणि उपनगरांमध्ये मनसेच्या वाहतुक शाखा रिक्षा चालकांच्या मदतीला धावून आली असून, रिक्षा चालकांची ऑनलाईन नोंदणी केली जात आहे. (Mns transport wing helps auto rikshaw unioun)

परवानाधारक रिक्षाचालकांना एकवेळचे अर्थसहाय्य देण्याची राज्य शासनाने घोषणा केली होती. त्यानंतर आता परिवहन विभागाने ऑनलाईन कार्यप्रणाली विकसित केली आहे. 24 मे पासून ऑनलाईन पद्धतीने रिक्षा चालकांना आपली नोंदणी करायची आहे. चालकांना वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक नोंद करावा लागतो, मात्र, सोप्या पद्धतीची प्रक्रिया असली तरी, रिक्षा चालकांना मात्र, ऑनलाईन पद्धत हाताळण्याची सवय नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

त्यातच सायबर कॅफे सध्या लॉकडाऊनमुळे बंद असल्याने, मोठी अडचण निर्माण झाली असतांना, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेनेच्या शाखा रिक्षा चालकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये निशुल्क पद्धतीने रिक्षा चालकांची नोंदणी केली जात आहे. त्यामूळे रिक्षा चालकांना दिसाला मिळाला आहे.

लॉकडाऊन असल्याने सायबर कॅफे बंद आहे. शिवाय रिक्षा चालक फार काही शिक्षीत नसल्याने, त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे शक्य होत नाही. त्यामूळे मुंबई उपनगरातील सर्व मनसेच्या वाहतुक शाखेच्या कार्यालयांमधून 1500 रूपयांचे अर्थसहाय्य मिळविण्यासाठी रिक्षा चालकांचे निशुल्क नोंदणी अभियान सुरू केले आहे. त्यासोबतच राज्यभरातील मनसे वाहतुक शाखांनी रिक्षा चालक बांधवांना मदत करावे.

- संजय नाईक, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: विराट कोहलीचा चौकार अन् मोडला राहुल द्रविडच्या नावावरील मोठा विक्रम! इंग्लंडमध्येही ठरला 'किंग'

IND vs ENG 2nd ODI: अनपेक्षित... भारतीय संघात एक बदल; विजयी संघात बदल करण्याची वेळ का आली? शुभमन गिल म्हणाला...

भारतातून OnePlus ची एक्झिट? 2027 पर्यंत कंपनी बंद होणार असल्याची चर्चा; ज्यांच्याकडे आत्ता मोबाईल आहे त्यांनी काय करायचं? वाचा

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडी कायम

Varandha Ghat Landslide Risk: वरंधा घाटात दरडींचा धोका कायम; रस्त्याशेजारील मातीचे ढिगारे तातडीने हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT