मुंबई

विलासराव देशमुखांचा 'तो' मोबाईल नंबर आजही सुरु, एकदा नक्की हा नंबर फिरवून पाहा..

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राजकारणातील राजहंस म्हणून ओळख असलेले विलासराव देशमुख. विलासराव देशमुख कितीही कामात असले तरीही विलासराव देशमुख हे त्यांना आलेले फोन स्वतः उचलायचे. देशमुख यांना नेहमीच सतत लोकांमध्ये राहणे, त्यांच्याशी संवाद साधणे हे कायमच आवडायचे. सर्वांच्या मनात त्यांनी महत्वाचे स्थान निर्माण केलं होतं. त्याच्या  याच एका सवयीमुळे त्यांच्याशी अनेकजण थेट संवाद साधत. कुणीही विलासराव देशमुख यांना  फोन केला आणि त्यांना शांततेत  असं कधी झालं नाही. विलासराव देशमुख एखाद्या वेळी कामात खूप व्यस्त असतील तर त्यांना ते  फोन करत असत. 

विलासराव यांचा ९८२११२५००० हा मोबाईल नंबर आजही कित्येकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. लातूर मधली आणि आसपासच्या ग्रामीण भागातील अनेक मंडळी विलासराव देशमुख यांना थेट फोन करत संपर्क ठेवत असत. विलासरावांबद्दलचं लोकांच्या मनात असणारं हे प्रेम पाहून त्यांचा हा मोबाईल नंबर आजही सुरु ठेवण्यात आलाय. या नंबरवर तुम्ही कधीही फोन करु शकता. फोन लावल्यानंतर तुमच्याशी विलासराव बोलत नाही पण, त्यांची गाजलेली भाषणे तुम्हाला ऐकायला जरूर मिळतील 

विलासराव प्रत्येकांसोबतच शांतपणे न रागवता संवाद साधायचे. एके दिवशी लातूरच्या जीप चालकाला वाहतूक पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांनी थेट विलासरावांना फोन केला. त्यावेळेस विलासरावांच्या विनंतीनंतर वाहतूक पोलिसांनी त्यांना सोडून दिले. असे एक ना अनेक किस्से आहेत. इतका मनाचा निरागस नेता महाराष्ट्राने गमावला याचे सर्वांनाच दुःख होत आहे. मात्र आजही प्रत्येकांच्या मनामनामध्ये विलासराव देशमुख यांचे अढळ आहे.

mobile number of vilasrao deshmukh is still working try this number once 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT