mobile recharge of rs 155 costs elderly man rs lakh cyber crime fraud police Sakal
मुंबई

Mumbai Crime : 155 रुपयांचे मोबाईल रिचार्ज ऑनलाईन करणे पडले लाखात; ऑनलाईन लाखोंचा गंडा

सांताक्रुझमधील 80 वर्षीय वृध्द नागरिकाला मोबाईल रिचार्ज करणे महागात पडले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सांताक्रुझमधील 80 वर्षीय वृध्द नागरिकाला मोबाईल रिचार्ज करणे महागात पडले आहे. 165 मोबाईल रिचार्जच्या बदल्यात सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या खात्यातून एक लाख रुपये लंपास केले. याप्रकरणी वाकोला पोलीस अधिकाधिक तपास करत आहेत.

या प्रकरणी तक्रारदार सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक आहेत. सायबर भामट्यांनी मोबाइल एप्लिकेशन डाऊन लोड करण्यास सांगून फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

25 जुलै मंगळवारी पीडित तक्रारदारांनी 155 रुपयांचे ऑनलाईन मोबाईल रिचार्ज केले होते. त्यावेळी त्यांच्या बँक खात्यातून रक्कम वजा झाली, पण मोबाइल रिचार्ज झाले नाही. त्यानंतर त्यांनी मोबाइल कंपनीला तक्रार करण्यासाठी ईमेल लिहिला.

ईमेल लिहिल्यानंतर तक्रारदार यांना मोबाईल कंपनीने संपर्क केला. मोबाईल कंपनीने तक्रारदाराला बँकेत जाऊन बँक खात्यातून रक्कम हस्तांतरीत झाल्याबाबत चौकशी करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदाराने बँकेत जाऊन तपासणी केली. त्यावेळी त्यांच्या बँक खात्यातून 155 रुपये हस्तांतरीत झाल्याचे बँकेतून सांगण्यात आले.

शुक्रवारी 28 जुलैला दुपारी पिडीत तक्रारदाराला राहुल नावाच्या व्यक्तीचा दूरध्वनी आला, त्याने आपण बँकेच्या सेवा केंद्रातून बोलत असल्याचे सांगितले. कंपनी त्यांना 155 रुपये परत करत असल्याचे आश्वासन दिले.

त्या बहाण्याने आरोपीने तक्रारदार यांना मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. तक्रारदाराने ॲप्लिकेश डाऊनलोड केल्यानंतर त्यांचा सीव्हीव्ही क्रमांक आरोपीला मिळाला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून विविध व्यवहारांद्वारे 1.02 लाख रुपये हस्तांतरीत करण्यात आले होते. याप्रकरणी त्यांनी वाकोला पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार यांच्या बँकेतील व्यवहारांच्या मदतीने पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

Latest Marathi News Live Update :एलपीजीची परिस्थिती अजूनही चिंताजनक: सरकार

"साडी चुरगळू नये म्हणून ती.." प्रसिद्ध डिझायनरचा ऐश्वर्याविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाला..

Gudipadwa: गुढीपाडव्याला घरपोच पुरणपोळी! महापालिकेचा उपक्रम; ऑर्डर करण्याची प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT