Mumbai Local sakal
मुंबई

Mumbai News : मोबाईल फोनवर बोलता बोलता रेल्वे रूळ ओलांडणे तरुणाच्या जीवावर बेतले; तरुणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर झाला व्हायरल

मोबाईल फोनवर बोलण्याच्या तंद्रीत रेल्वे रूळ ओलांडणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना नुकतीच जुईनगर रेल्वे स्थानकात घडली.

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई - मोबाईल फोनवर बोलण्याच्या तंद्रीत रेल्वे रूळ ओलांडणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना नुकतीच जुईनगर रेल्वे स्थानकात घडली. अनिलकुमार राजकुमार पटेल (26) असे या तरुणाचे नाव असून या तरुणाचा सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झालेला व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

संवादाचे साधन असलेल्या मोबाईल फोनचा वापर बहुतेक नागरिक करत असतात, मात्र, काही व्यक्ती या मोबाईलचा अतिवापर करताना दिसून येतात. काही व्यक्ती तर इअर फोन लावून मोबाईल फोनमध्ये इतके मग्न होतात की, त्यांना समोर, आजुबाजुला काय घडत आहे, याची कल्पना देखील नसते. असाच काहीसा प्रकार गत 25 डिसेंबर रोजी सकाळी जुईनगर रेल्वे स्थानकात घडला. तुर्भे येथे राहणारा अनिलकुमार राजकुमार हा तरुण 25 डिसेंबर रोजी सकाळी आपल्या कामावरुन सुटल्यानंतर खारघर येथुन तुर्भे येथे जाण्यासाठी जुईनगर रेल्वे स्थानकात उतरला होता. तेथून त्याला तुर्भे येथे जाण्यासाठी दुसऱया फलाटावर जायचे होते.

मात्र त्याने पादचारी पुलाचा वापर न करता, शॉर्टकट मारुन मोबाईल फोनवर बोलता बोलता फलाटावरील रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या फलाटावर जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनिलकुमार हा मोबाईल फोनवर बोलण्यात इतका मग्न होता की, त्याला त्याच रेल्वे रुळावरुन येत असलेली लोकल निदर्शनास आली नाही. त्यामुळे तो मोबाईल फोनवर बोलता बोलता लोकलच्या खाली चिरडला गेला. या घटनेत अनिलकुमार याच्या शरीराचे तुकडे झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिलकुमारचा जुईनगर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झालेला व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या घटनेतील मृत अनिलकुमार पटेल हा तरुण खारघर मधील एका खाजगी हॉस्पीटलमध्ये काम करत होता. अनिलकुमारच्या मोठया भावाच्या पत्नीची तब्येत बिघडल्याने तिला दवाखान्यात नेण्यात येणार होते. याबाबत अनिलकुमारच्या भावाने त्याला फोन करुन सांगितले होते.

त्यामुळे अनिलकुमार हा त्यादिवशी सकाळी 24 तास डयुटी करुन तुर्भे येथील आपल्या घरी जाण्यासाठी निघाला असताना, हा प्रकार घडला. अनिल कुमार याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT