Modi hatao desh bachao campaign of aap sakal
मुंबई

Mumbai News : आपची 'मोदी हटाओ, देश बचाओ' मोहिम सुरू!

पोस्टर लावण्यास पोलिसांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आम आदमी पक्षाने देशभर "मोदी हटाव देश बचाव" ही मोहिम आजपासून सुरू केली असून आज या मोहिमेचे पोस्टर लावत असताना पोलिसांनी विरोध केला. त्यावरून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.

मुंबईसह राज्यभरात ही मोहिम राबविण्यात येत असून नागरिकांमध्ये या मोहिमेची जागृती व्हावी हा या मोहिमेचा उद्देश असल्याची माहिती आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोस्टर लावण्याची मोहिम सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येत आहे. मात्र मुंबईत पोलिसांनी पोस्टर लावण्यास विरोध केला आहे. पोलिसांनी विरोध केला तरी ही मोहिम राज्यभर राबविली जाईल असेही त्या म्हणाल्या.

ब्रिटिश काळातील कायदे जनतेवर पुन्हा एकदा लादून मोदी सरकार देशातील जनतेचा आवाज चिरडण्याचा प्रयत्न करत आहे, जर आता आपण या जुलूमशाहीच्या विरोधात उभे नाही राहिलो, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत, असेही प्रीती शर्मा मेनन यावेळी म्हणाल्या. यावेळी आम आदमी पार्टी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष धनराज वंजारी, मुंबईचे कार्याध्यक्ष रूबेन मस्करेन्हस व द्विजेंद्र तिवारी, महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे, मुंबई उपाध्यक्ष पायस व्हर्गीस आदी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT