Lakadawal
Lakadawal Sakal
मुंबई

राणांनी कर्ज घेतलेल्या लकडावालांसोबत पवारांचा फोटो; भाजप नेत्याचं ट्वीट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्री समोर हनुमान चालिसा पठनाच्या वादानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या नवनीत राणांवर (Navneet Rana) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केले होते. राणा यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित आणि ईडीने अटक केलेल्या युसुफ लकडावाला (Yusuf Lakdawala) याच्याकडून 80 लाख घेतले होते असा आरोर राऊत यांनी केला होता. याबाबत त्यांनी ट्वीटदेखील केले होते. दरम्यान, राऊतांच्या या आरोपांनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्वीटवर एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) युसूफ लकडावालासोबत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे, आता या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.

मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ट्विटर अकाऊंटवरुन दोन-तीन फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी एका फोटो निळा कोट परिधान केलेला युसूफ लकडावाला असून त्याच्या बाजुला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आहेत, असा दावा कंबोज यांनी केला आहे. त्यामुळे, आता संजय राऊत याप्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल करणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

नवनीत राणांचा 'डी गँग'शी आर्थिक व्यवहार

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी दाऊदशी संबंधित युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाखांचं कर्ज घेतलं, असा सनसनाटी आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. तसेच नवनीत राणा यांनी घेतलेल्या कर्जाबाबत ईडीनं तपास करायला हवा असे म्हणत हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याचंही राऊत यांनी म्हटलं होतं. ईडी (ED) या प्रकरणाची चौकशी करेल का? असा सवालही त्यांनी ट्विटद्वारे उपस्थित केला होता. त्यानंतर आता मोहित कंबोज यांनी लकडावाला यांच्यासोबतचा शरद पवार यांचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता संजय राऊत याप्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल करणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT