Mohit Kamboj
Mohit Kamboj 
मुंबई

'शरद पवार, मी तुम्हाला...' पालिकेचे आधिकारी घरी येण्याआधीच मोहित कंबोजचं ट्वीट

सकाळ डिजिटल टीम

राज्यात ईडीच्या छापासत्रानंतर घडाडमोडींना वेग आला आहे. यातच भाजप नेता मोहित कंबोज याने सतत महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करून त्यांच्याविरोधात शड्डू ठोकला. सर्वप्रथम आर्यन खानच्या प्रकरणात नवाब मलिक यांनी मोहित कंबोजचं नाव समोर आणलं होतं. यानंतर कंबोज याने सतत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात आरोपांना सुरुवात केली. काल उद्धव ठाकरेंचं मेहुणे पाटणकर यांच्या ठाण्यातील मालमत्तांवर सक्तवसुली संचलनालयाने छापा टाकला. त्यांच्या ११ सदनिका देखील सील करण्यात आल्याचं कळतंय.

एकीकडे हे प्रकरण सुरू असताना मुंबई महानगरपालिकेने मोहित कंबोजला नोटीस दिली आहे. सांताक्रुझमधील कंबोज याच्या इमारतीत अनधिकृत बांधकाम झाल्याचा संशय मनपाला आहे. त्यामुळे त्यावर कारवाई होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मोहित कंबोज नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर टीका करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर होत असलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मात्र, या तपासणीच्या नोटीशीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोहित कंबोज यांनी म्हटलंय की, काहीही करा मी झुकणार नाही.

आज पालिकेचे अधिकारी त्यांच्या घरावर धडकणार असल्याची माहिती मिळत आहे. कंबोज यांच्याशी निगडीत अनधिकृत बांधकामाचा आढावा घेणार आहेत. त्याधी कंबोज यांनी पुन्हा ट्वीट करत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना घाबरत नसल्याचं सांगितलं. माझं जे काही करायचं ते करा. खोट्या नोटिशी आणि केसेसे करायच्या असतील तर तेही करा, माझा महाविकास आघाडी विरोधातील संघर्ष सुरू राहणार, असं ट्वीट कंबोजने केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : युतीची सत्ता येताच उद्धवजींना मुख्यमंत्रिपदाचे वेध

आगळी दक्षिणकोंडी

‘लाट’विरहित निवडणुकीचा अन्वयार्थ...

मेंदूवर आदळणाऱ्या डिजिटल-प्रचारातून सुटलेलं काही...

एक दूसरे से करते है प्यार हम...

SCROLL FOR NEXT