Mokhada tribal women's  sakal media
मुंबई

मोखाडा : सोनोग्राफी मशीन सुरू करण्यासाठी गरोदर मातांची रूग्णालयावर धडक

आमची दखल कोणी घेईल  ? आदिवासी मातांचा सवाल

भगवान खैरनार

मोखाडा : मोखाडा ग्रामीण रूग्णालयातील (Mokhada hospital) सोनोग्राफी मशीन (sonography machine) गेल्या चार महिन्यांपासून ऑपरेटर विना बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील हजारो गरोदर आणि स्तनदा मातांच्या (pregnant woman health) आरोग्याचा प्रश्न (health problems) ऐरणीवर आला आहे. अखेर संतप्त झालेल्या आदिवासी महिलांनी (tribal women's) रूग्ण सेवा समितीच्या सदस्या व आरोहण संस्थेच्या प्रकल्प अधिकारी माधुरी मुकणे (madhuri mukane) यांच्या नेतृत्वाखाली मोखाडा ग्रामीण रूग्णालयाला धडक देत प्रशासनाला जाब विचारला आहे.  

मोखाडा तालुक्यातील कुपोषणाला आळा घालण्यासाठी व गरोदर मातांची काळजी घेण्यासाठी आरोहण सामाजिक संस्थेने, सिमेंन्स कंपनीच्या माध्यमातून ऑगस्ट  2018  मध्ये मोखाडा ग्रामीण रूग्णालयाला सोनोग्राफी मशीन ऊपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे तालुक्यातील गरोदर मातांची वेळेवर तपासणी होऊन काही अंशी कुपोषणाला आळा बसला आहे. मात्र, जुलै महिन्यांपासून सोनोग्राफी मशीन बंद असल्याचे कारण देत रूग्णालय प्रशासन, तपासणीसाठी येणाऱ्या गरोदर मातांना माघारी पाठवत आहे. त्यामुळे पदरमोड करून त्यांना खाजगी दवाखान्यात अथवा जव्हारला जाऊन सोनोग्राफी करून घ्यावी लागते आहे. 

गरोदर मातांनी ही बाब आरोहण संस्थेच्या मोखाडा तालुका प्रकल्प अधिकारी व रूग्ण सेवा समिती सदस्या माधुरी मुकणे यांच्या निदर्शनास आणून दिली. अखेर, मुकणे यांनी गरोदर मातांना घेऊन, मोखाडा ग्रामीण रूग्णालयाला धडक दिली आणि सोनोग्राफी मशीन बंद असल्याचा जाब विचारला. त्यावेळी सोनोग्राफी मशीन हातळणारा ऑपरेटर नसल्याने मशीन बंद ठेवण्यात आले आहे. तसेच ऑपरेटर ला मानधन देण्यासाठी निधीच ऊपलब्ध नसल्याचे, धक्कादायक वास्तव सांगण्यात आल्याने, गरोदर माता संतप्त झाल्या आहेत. या घटने विषयी मोखाडा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ महेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही. 

"मोखाडा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ महेश पाटील यांनी  11  नोव्हेंबर पासुन सोनोग्राफी मशीन सुरू करून कॅम्प घेतला जाईल असे सांगितले आहे. गरोदर मातांची सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी सुरू न झाल्यास गरोदर मातांना घेऊन आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल."

- माधुरी मुकणे, रूग्ण सेवा समिती सदस्य व प्रकल्प अधिकारी, आरोहण संस्था.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT