Mokhada News:  sakal
मुंबई

Mokhada News: अवकाळीच्या पीडीतांना भाजपचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा

Palghar News: मोखाडा तालुक्यात मागील आठवड्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बहुतांश गावातील घरांना फटका बसला आहे. अनेकांच्या घरांवरील छप्पर उडाल्याने, त्यांचे संसार ऊघड्यावर आले आहेत.

मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची दखल घेत, निवडणूकीची धामधूम संपताच, भाजप चे पालघर लोकसभेचे ऊमेदवार व भाजप आदिवासी विकास आघाडीचे प्रदेश सरचिटणीस डाॅ हेमंत सवरा यांनी मोखाड्यात येऊन पीडीत कुटूंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे. तसेच भाजपा मोखाडा तालुका अध्यक्ष संतोष चोथे यांनी तात्काळ आर्थिक मदतीचा हात देऊन, पीडीत कुटूंबाना दिलासा दिला आहे.

भाजपचे लोकसभेचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांनी मोखाड्यातील अवकाळीने नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली आहे. डॉ हेमंत सवरा यांनी मोखाडा तालुक्यातील सातुर्ली व विविध भागातील नुकसान, पडझड व घरावरील छप्पर हरपलेल्या गावांतील घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

यावेळी नुकसान झालेल्या लोकांसोबत संवाद साधून त्यांना धीर दिला व शासन स्तरावरून योग्य ती मदत लवकरात लवकर मिळवुन देणार असल्याचे आश्वासन पीडीत कुटूंबाना दिले आहे. तर भाजप मोखाडा तालुकाध्यक्ष संतोष चोथे यांनी पीडीत कुटूंबाना आर्थिक मदतीचा हात देऊन दिलासा दिला आहे. त्यामुळे पीडीत कुटूंबानी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीप पावडे, भाजपा मोखाडा तालुका अध्यक्ष संतोष चोथे, भाजपा पालघर जिल्हा चिटणीस विठ्ठल पाटील, ज्येष्ठ नेते रघुकाका डिंगोरे, दिशांत पाटील, शुभम डिंगोरे, हर्षल बात्रे, भरत नडगे, जनार्दन गभाले, नरेंद्र चौधरी, हरिभाऊ पाटील, व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात पुजाऱ्यांचं आंदोलन सुरु; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT