agriculture officer akash solunke and nirmala kurhad

 

sakal

मुंबई

Mokhada News : सकाळ बातमीचा परिणाम! नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी अधिकारी शेतात.

Sakal Report Spurs Action: Mokhada Officers Step Into Fields : सकाळच्या बातमीनंतर मोखाडा तालुका कृषी अधिकारी, नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी थेट शेताच्या बांधावर गेल्याचे दिसले.

सकाळ वृत्तसेवा

मोखाडा : पालघर जिल्ह्यात परतीचा पाऊस मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे खरीप पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. याविषयी सकाळ ने शेतकर्यांची कैफियत मांडत" आस्मानी संकट " या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली. त्याची दखल घेत, मोखाडा तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी, नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी शेतात पाहणीसाठी गेले आहेत. तसेच या बाबतची माहीती शासनाला कळवली जाईल असे शेतकर्यांना आश्वासन दिले आहे.

तालुका कृषी अधिकारी आकाश सोळुंके, उप कृषी अधिकारी श्रीमती निर्मला कुऱ्हाड, सहाय्यक कृषी अधिकारी, दीपक कोल्हे व कृषी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांनी सकाळ मध्ये आस्सानी संकट या बातमीची दखल घेत, भात शेत्र शेत पिकांचे नुकसानी बाबतची क्षेत्रीय पाहणी केली आहे.

डोल्हारा, आरोशी, खोडाळा परिसरा मध्ये त्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून व खळ्यावर जाऊन पाहणी केली आहे. तसेच सर्व क्षेत्रीय कर्मचारी व अधिकारी यांना तालुका कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून नजर प्राथमिक अंदाज नुकसान क्षेत्र कळविण्याबाबत आदेशित दिले आहेत.

संपूर्ण तालुक्यामध्ये कृषी विभागाच्या यंत्रणेने नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून प्रार्थमिक नुकसानीची क्षेत्र कळवलेले आहे. आडोशी सरपंच बाळू जयराम घाटाळ ,शेतकरी मंगेश ठोमरे,आनंता पाटील, भगवान पाटील, भरत पाटील, दिगंबर पाटील, प्रभाकर पाटील, काशिनाथ पिटोले यावेळी ऊपस्थित होते.

सदरची प्राथमिक नुकसानीची आकडेवारी शासनास सादर केल्यानंतर शासन स्तरावरून जर आदेश निर्गमित झालेत तर डिटेल पंचनामे' करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल यात ग्रामसेवक सहाय्यक कृषी अधिकारी व तलाठी असे संयुक्त स्वाक्षरीचे पंचनामे करण्यात येतील

- आकाश सोळुंखे, तालुका कृषी अधिकारी, मोखाडा तालुका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

सायबर फ्रॉडपासून बचावासाठी ‘ही’ पंचसूत्री लक्षात ठेवाच! अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर रिकामे होईल बॅंक खाते; सोलापूर शहर सायबर पोलिस म्हणतात...

Uddhav Thackeray Statement : ''मुंबईत अ‍ॅनाकोंडा येऊन गेला अन् भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची'' ; उद्धव ठाकरेंचं विधान!

SCROLL FOR NEXT