minor girl molestation esakal
मुंबई

Mumbai Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपी सुरक्षा रक्षकाला अटक

मालाड परिसरातील 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मालाड परिसरातील 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली. मालाड येथील उच्चभ्रू इमारतीत 14 वर्षीय पिडीत मुलगी कुटुंबासह वास्तव्यास आहे. इमारतीच्या आवारात पिडीत मुलगी मित्र मैत्रिणींसोबत खेळत असताना आरोपीने हा गुन्हा केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलगी राहत्या इमारतीच्या आवारात सोमवारी मित्र मैत्रिणींसोबत खेळत होती. त्यावेळी तिला शौचालयात जायचे असल्यामुळे तिने इमारतीतील सुरक्षा रक्षकाला महिलांच्या शौचालयाबाबत विचारणा केली. महिलांचे शौचालय बंद असून आरोपीने पीडित मुलीला पुरुषांच्या शौचालयात जाण्यास सांगितले.

तेथून आल्यानंतर मुलीने पाण्याची मागणी केली असता आरोपीने मसाज रूममध्ये नेऊन पाणी देण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानुसार कुटुंबियांना याप्रकरणी मालाड पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सुरक्षा रक्षकाला मंगळवारी अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shakti Cyclone : अतिवृष्टीनंतर आणखी एक अस्मानी संकट! 'शक्ती' चक्रीवादळ महाराष्ट्राच्या वेशीवर, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा...

Cheque Clearance Rule: आरबीआयचा मोठा निर्णय; आजपासून चेक लगेच क्लियर होणार, बँकिंग सिस्टीममध्ये मोठा बदल

AVN Disease: एव्हीएन प्रमुख कारण, अत्याधुनिक उपचारांनी सर्वसामान्य आयुष्य जगणे शक्य; तारुण्यातच ‘हिप जॉइंट रिप्लेसमेंट

E-Registration : ई-रजिस्ट्रेशनमुळे नोंदणीप्रक्रिया झाली सोईस्कर

Sindhudurg Sea Drowning : धक्कादायक! वेळागर समुद्रात नऊजण बुडाले, मोठी लाट आली अन् सर्वच खेचले गेले; मुलासह तिघांचे मृतदेह हाती, शोध मोहीम सुरू

SCROLL FOR NEXT