Momo-Challenge-Game 
मुंबई

'मोमो' म्हणजे मरणच!

सकाळवृत्तसेवा

मुंबई - गतवर्षीच्या "ब्ल्यू व्हेल'च्या धुमाकुळानंतर यंदा "मोमो चॅलेंज' गेममुळे अर्जेंटिनात एका तरुणीचा मृत्यू झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. या गेममध्ये अतिशय भयंकर, हिंसक व्हिडिओ, फोटो, ऍनिमेशन्स पाठवून ब्रेनवॉशद्वारे हिंसक कृत्त्यांसाठी प्रवृत्त केले जाते. यातील शेवटचा टास्क आत्महत्येला प्रवृत्त करणारा असतो.

समाजमाध्यम तज्ज्ञ शेखर पाटील यांनी सांगितले की, "ब्ल्यू व्हेल' चॅलेंजमध्ये वेबसाइट, मेसेंजर, चॅटिंग ग्रुप्स आदींच्या माध्यमातून सूत्रधार कार्यरत असे. "मोमो' चॅलेंजमध्ये मात्र विशिष्ट क्रमांकावरून सूत्रधार काम करत असतो.

म्हणजे या क्रमांकाच्या व्हॉट्‌सऍप अकाउंटवर जाऊन मेसेज केल्यानंतरच हा गेम खेळता येतो. कुणीही उत्कंठेसाठी या प्रकारचा मेसेज करताच या अकाउंटवरून त्या व्यक्तीला व्हॉट्‌सऍपवर अतिशय भयंकर व हिडीस असे व्हिडिओ, मेसेज व इमेज येऊ लागतात. यातूनच त्या व्यक्तीला विविध टास्क दिले जातात.

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते "ब्ल्यू व्हेल' चॅलेंजमध्ये एकलकोंड्या स्वभावाचे टीन एजर्स जास्त बळी गेल्याचे दिसून आले आहे. मुळातच पौगंडावस्थेचा कालखंड हा खूप विचित्र असतो. शरीर आणि मनातील बदलांमुळे कुणीही गोंधळून जात असतो. याच वयात फॅंटसी भुरळ घालत असते.

परिणामी कुणीही आपल्या भोवतालापासून पळ काढून आभासी विश्‍वात रममाण होण्याचा प्रयत्न करत असतो. यातून कुणी "मोमो' चॅलेंजसारख्या गेमच्या नादी लागल्यास त्याचे आयुष्य उद्‌ध्वस्त होऊ शकते.

विख्यात जपानी शिल्पकार मिदोरी हयाशी यांनी "मोमो' या नावाने एक शिल्प तयार केले आहे. यावरूनच "मोमो चॅलेंज' या आत्मघातकी गेमसाठी क्रॉप करून "मोमो'ची भयावह प्रतिमा वापरली आहे.

संवाद महत्त्वाचा
अशा धोकादायक गेमपासून बालके व कुमार वयातील मुलांना दूर ठेवण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी संवाद साधणे महत्त्वाचे असते. घरात तसेच घराबाहेरही सुसंवाद असल्यास कुणीही "मोमो' चॅलेंजसारख्या विकृतीला बळी पडणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT