ST Bus strike
ST Bus strike sakal media
मुंबई

एसटी संपासाठी गोळा केलेले पैसे गेले कुठे?कर्मचाऱ्यांचा सवाल

प्रशांत कांबळे

मुंबई : एसटीच्या इतिहासात सर्वाधिक काळ लांबलेला संप (ST bus corporation strike) अजूनही सुरू आहे. त्यामुळे रोज बडतर्फ, निलंबित कर्मचाऱ्यांची (suspended employee) संख्याही वाढत आहे. अशात संपाच्या न्यायालयीन लढाईसाठी (court case) कर्मचाऱ्यांकडून गोळा करण्यात आलेल्या पैशांबाबत (money collection from employee) प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे कोट्यवधी रुपये कुणाच्या खिशात गेले, असा सवाल करत या पैशांचा हिशेब देण्याची मागणी (money collection Accounting) कर्मचाऱ्यांकडून होत आहे. संपकरी नेते मात्र पैशांबद्दल माहिती नसल्याचे सांगून आपले हात झटकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. (Money collection for court case in ST bus strike accounting demand of employee)

संपकाळात एसटी कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती, बडतर्फ व निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याविरोधात लढण्यासाठी तसेच विलीनीकरणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर आणि सरचिटणीस शेषराव ढोणे यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ३०० ते एक हजार रुपयांपर्यंत मागणी केली होती. शिवाय वकील निःशुल्क केस लढणार असून फक्त न्यायालयीन खर्चासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगितले होते.

तसेच, कर्मचाऱ्यांकडून पैसे मागताना यातील एकाही रुपयाचा अपहार झाल्यास आम्हाला शिक्षा द्या, असे सरचिटणीस ढोणे यांनी सांगितले होते; मात्र आता हे पैसे कुठे गेले, याबाबत विचारले असता शेषराव ढोणे यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील इतर कर्मचारी संघटनांनीही यामध्ये उडी घेतली असून आधीच एसटी कर्मचारी अडचणीत असताना त्यांच्याकडून उकळलेल्या पैशांचा संपकरी नेत्यांनी हिशेब द्यायलाच पाहिजे, अशी मागणी केली आहे.

"अॅड. जयश्री पाटील यांच्याकडे सर्व पैसे गोळा केले आहेत. त्यांच्या इमारतीचे आणि घरातील सीसीटीव्ही तपासल्यास आपल्याला माहिती मिळेल."
- अजय गुजर, अध्यक्ष, कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटना

किती पैसे गोळा झाले?

संपाच्या न्यायालयीन लढ्यासाठी सरसकट सर्व एसटी कर्मचाऱ्यांकडून ३०० रुपये, निलंबित कर्मचाऱ्यांकडून ५०० रुपये, बडतर्फीच्या नोटीस दिलेल्या कर्मचाऱ्यांकडून ५००, बदल्यांसाठी ५०० आणि सेवा समाप्तीसाठी ५०० रुपये; तर काहींनी एक हजार रुपयांपर्यंत पैसे जमा केले आहेत. राज्यभरातील सुमारे ८७ हजार कर्मचाऱ्यांपेक्षाही जास्त कर्मचाऱ्यांनी पैसे गोळा केल्याने या पैशांचा आकडा कोटीच्या घरात आहे.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये गोळा करण्यात आले. संपाची नोटीस देणाऱ्या संघटनेने याबाबत माहिती देण्यास नकार देत ज्यांनी हे पैसे गोळा केले, त्यांना विचारा, असे म्हटले आहे. दुसरीकडे, संपकऱ्यांचे वकील पत्र स्वीकारणाऱ्या वकिलांनी निःशुल्क केस लढण्याचे जाहीर केले आहे. मग या पैशाचा विनियोग कुठे व कशासाठी झाला, याची कायदेशीर चौकशी होणे आवश्यक आहे.
- हिरेन रेडकर, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना

संपादरम्यान निलंबित, बडतर्फ यासह कुठल्याही कारवाया व आर्थिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. कर्मचाऱ्यांचे नुकसान झाल्यास संपूर्ण जबाबदारी घेणार असल्याचे भासवून कामगारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनीच याबाबत विचार केला पाहिजे.
- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)

पैसे गोळा केल्याचे अजय गुजर यांनी स्वतः नाकारले आहे. याचाच अर्थ कुणी माया जमा केली, हे गुजर यांना माहीत आहे. त्यामुळे याविषयी त्यांनीच अधिक स्पष्ट बोलावे आणि संभ्रम दूर करावा.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस

एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेले पैसे अजय गुजर यांच्याकडे आहेत, की वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे, हे कर्मचाऱ्यांना माहीत झाले पाहिजे.
- सुनील निरभवणे, सरचिटणीस, कास्ट्राईब रा. प. कर्मचारी संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE: काही वेळातच सुरू होणार चौथ्या टप्प्यातील मतदान; केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा

Sushma Andhare : "मिस्टर राज, तुम्हाला माझ्या नावाची सुपारी..." सुषमा अंधारे यांचा लाव रे तो व्हिडीओवरून हल्लाबोल

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Ravindra Dhangekar : भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचं पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन

Loksabha election : निवडणूक किस्सा! अमिताभ बच्चन उमेदवार अन् लिपस्टिकच्या खुणा असलेल्या चार हजार मतपत्रिका...

SCROLL FOR NEXT