money laundering case yes bank dhfl Avinash Bhosle received 320 crores 90 page charge sheet ED mumbai Sakal
मुंबई

Avinash Bhosale : ईडीकडून अमित भोसले विरुद्ध दोषारोप पत्र दाखल

मनी लॉण्डरिंगच्या आरोपात अटकेत असलेले पुण्यातील बिल्डर अविनाश भोसले यांच्यावर येस बॅंक-डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणात ईडीने विशेष न्यायालयात ९० पानी आरोपपत्र आज दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यांच्याविरुद्ध सक्त वसुली संचालनालयाने न्यायलायात दोषारोपपत्र दाखल केले आहे. मागील वर्षी पासून सुरू असलेल्या या चौकशीमध्ये "एआरए प्रॉपर्टीज" व अन्य दोन जमिनीच्या प्रकरणात हे सहा हजार पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अविनाश भोसले यांचे "एबी आयएल" हे मुख्यालय सरकारी अधिकारी यांच्यासाठी राखीव असलेल्या जागेवर आहे. ही जमीन ईडीने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात जप्त केली होती.

"ईडी"ने ऑगस्ट २०२१ मध्ये या प्रकरणाशी संबंधित 4 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या जमिनीवर भोसले यांची "एबीआयएल" आणि इतर कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालये आहेत. 'ईडी"ने 2016 मध्ये भोसले यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, संबंधित सरकारी जमीन ही केवळ सरकारला हस्तांतरीत करता येऊ शकते, असे असतानाही संबंधित जमीनएका व्यक्तीने "एआरए" कंपनीला हस्तांतरित करीत नियमांचे उल्लंघन केले.मनी लाँड्रिंगच्या तपासादरम्यान, विविध ठिकाणी शोध आणि जप्तीची कारवाई करण्यात आली. त्या कागद पत्रावरून "ईडी"ने अमित भोसले यांच्या विरुद्ध कारवाई केली आहे. त्यानुसार ,आता न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.

अविनाश भोसले व व्यावसायिक सत्येन टंडन यांच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हे दोषारोपपत्र येस बँक डीएचएफएलमध्ये (डिएचएफएल) तीन हजार ७०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आहे. घोटाळ्याप्रकरणी सुरवातीला सीबीआयने त्यांना अटक केली होती त्यांनतर त्यांची ईडीने चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांना ईडीने अटकही केली. अविनाश भोसले हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्यानंतर आता भोसले यांचा मुलगा अमित भोसले याच्या विरुद्ध "ईडी"ने हि दोषारोपपत्र दाखल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT