mansoon 
मुंबई

मॉन्सून 6 जूनला राज्यात? 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या पूर्वमोसमी पावसामुळे 6 ते 8 जून या कालावधीत मॉन्सूनचे आगमन होईल, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने वर्तवला आहे. 

मॉन्सूनने रविवारी बंगालच्या उपसागराचा नैर्ऋत्य, ईशान्य, पश्‍चिम व पूर्व-मध्य भाग व्यापला; तर त्रिपुराच्या बहुतांश भागांत मॉन्सूनचे आगमन झाल्याची घोषणा केंद्रीय वेधशाळेने केली आहे. राज्यातही पूर्वमोसमी पावसाचा जोर सुरू आहे. उत्तर कोकणाला पूर्वमोसमी पावसाने शनिवारी सायंकाळनंतर चांगलेच झोडपले. मुंबईत शनिवारी रात्री 26 मि.मी. पावसाची नोंद झाली. काही दिवसांपूर्वी 36 अंशांवर पोहोचलेले कमाल तापमानही पावसामुळे आता खाली सरकल्याचे दिसून येत आहे.

रविवारी कमाल पारा 34.6 अंश सेल्सिअसवर; किमान पारा चार अंशांनी खाली येत 23 अंश सेल्सिअसवर नोंदवला गेला. दररोज सायंकाळी आणि रात्री मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटांसह पूर्वमोसमी पावसाचा मारा मुंबईत सुरूच राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसासह सोसाट्याचा वारा वाहेल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 1st Test: शुभमन गिलला नेमकं काय झालं, एका चौकारानंतर अचानक सोडलेलं मैदान! BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Thane News: ४५ मिनिटांचा प्रवास ५ मिनिटांत पूर्ण होणार! ठाणे ते भिवंडी मार्गाची कोंडी सुटणार; MMRDAची नवी योजना

Latest Marathi Live News Update : माजी केंद्रीय मंत्री आरके सिंह यांच्यावर भाजपची मोठी कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित

Mobile Restart: मोबाईल का करावा नियमित रीस्टार्ट? वर्षानुवर्ष फोन वापरत असणाऱ्यांना नाही माहिती जबरदस्त फायदे

व्हायरल पत्र, मौलवीसोबत निकाह अन्...; पाकिस्तानमध्ये गेलेली भारतीय महिला अचानक बेपत्ता, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT