corona-mumbai.jpg
corona-mumbai.jpg 
मुंबई

फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये मुंबईत ४७५ टक्के कोरोना रुग्णवाढ

दीनानाथ परब

मुंबईत मार्च महिन्यात ८८,७१० जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाली. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण ४७५ टक्के आहे. मुंबई महापालिकेच्या डाटाच्या विश्लेषणावरुन ही माहिती समोर आलीय. फेब्रुवारी महिन्यात मुंबईत १८,३५९ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तेच यावर्षी जानेवारी महिन्यात मुंबईत १६,३२८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात मुंबईत ७०,३५१ अधिक कोरोना रुग्ण आढळले. जानेवारीच्या तुलनेत मार्चमध्ये ७२,३८२ कोरोना रुग्णांची संख्या वाढली. 

मार्च महिन्यात कोरोनामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत २१६ रुग्णांचा मृत्यू झाला. फेब्रुवारीत कोरोनामुळे ११९ नागरिकांचा मृत्यू झाला होता. एकामहिन्यात मृत्यूदर वाढीचे प्रमाण १८१ टक्के आहे. पहिल्या दोन महिन्यात एकूण २३७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ३१ मार्चपर्यंत मुंबईत चार लाख १४ हजार ७१४ जणांना कोरोनाची बाधा झाली.

मृत्यूची संख्या ११,६८६ पर्यंत पोहोचली. ३१ मार्चपर्यंत ५१,४११ एक्टिव्ह केसेस आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीस हीच संख्या ९,७१५ होती. कोरोना रुग्ण संख्या वाढल्यामुळे मुंबईत रिकव्हरी रेट ८५ टक्क्यापर्यंत खाली घसरला. फेब्रुवारीत हा रिकव्हरी रेट ९३ टक्के होता. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT