मुंबई

मेकअप आर्टिस्ट्सनी केला वर्ल्ड रेकॉर्ड, 1500 हुन अधिक मेकअप आर्टिस्टनी केला ऑनलाइन मेकअप

सुमित बागुल

मुंबई, 21 : कोरोना काळात आलेली मरगळ आणि नैराश्य दूर करण्यासाठी 20 डिसेंबर या दिवशी सलोन असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) तर्फे एकाच वेळी 1500 हुन अधिक मेकअप आर्टिस्टनी ऑनलाइन मेकअप करण्याचा नवा जागतिक विक्रम केला आहे. यात मेकअप आर्टिस्ट निलेश रणदिवे आणि त्यांच्यासारखे अनेक आर्टिस्टनी आपली हजेरी लावून या सोनेरी क्षणाचा अनुभव घेतला.

हे वर्ष "कोरोना" महामारीमुळे सर्वांनाच त्रास, दुःख आणि आर्थिक अडचणीचे गेले. त्यात सलोन व्यावसायिकांसाठी हे वर्ष अत्यंत हालाकीचे गेले आहे. अशात वर्ष संपता संपता काहीतरी नवीन करावे हा ध्यास सलोन इंडस्ट्रीने घेतला आणि त्यानुसार 20 डिसेंबरला जागतिक विश्वविक्रम करण्याचे ठरवले. त्यानुसार, देशभरातील एकाच वेळेला 1500 मेकअप आर्टिस्ट ऑनलाइन येऊन अनेक माॅडेलचा मेकअप केला आणि विश्व विक्रम रचला. 

सलोन असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) संस्थापक दत्ता चव्हाण पदाधिकारी किसन कोल्हारे, प्रकाश चव्हाण, नाभिक महामंडळचे भगवान बिडवे, तसेच सलुन  इंड्रस्टीचे सर्वेसर्वा, इंटरनेशनल हेयर आर्टिस्ट आणि ऑल इंडिया असोसिएशनचे महाराष्ट्र सेक्रेटरी उदय टक्के यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अध्यक्ष हरीश भाटिया, अशोक पालीवाल, यांच्या नेत्रुत्वात हा जागतिक विश्व विक्रम रचण्यात मदत झाली अशी भावना मेकअप आर्टिस्ट निलेश रणदिवे यांनी व्यक्त केली. त्यामुळे ही बाब इंडस्ट्रीसाठी अत्यंत आनंदाची असून देशातील नागरिकांसाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे सलोन व्यावसायिकांमधील मरगळ दूर होण्यास मदत होईल असंही ते म्हणालेत. 

more than 1500 makeup artist did online make up and set new world record

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

Latest Marathi News Updates : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

SCROLL FOR NEXT