परतीच्या प्रवासासाठी ग्रुप बुकिंग करण्याचे एसटी प्रशासनाकडून आवाहन 
मुंबई

परतीच्या प्रवासासाठी महाड एसटी आगार सज्ज

सकाळ वृत्तसेवा

महाड (बातमीदार) : गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या भक्तांसाठी परतीचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून एसटीच्या जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठी गणेशभक्तांकडून आतापर्यंत ७० एस.टी. बसेस बुक करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी परतीच्या प्रवासापूर्वी दोन दिवस आधीच ग्रुप बुकिंग करण्याचे आवाहन एस.टी. प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

एसटीने महाडसह संपूर्ण कोकणात नियमित बसेस व्यतिरिक्त गणेशभक्तांना येण्यासाठी जादा बसेस सोडल्या आहेत. याचा फायदा कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना झाला आहे. आता दीड दिवस आणि पाच दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनानंतर पुन्हा मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरांत परत जाण्यासाठी एसटीने ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. या वेळी आधीच अपुरी सुविधा असलेल्या एसटी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. यामुळे एसटीने ग्रुप बुकिंगची सुविधा दिली आहे. ही सुविधा ऑनलाईन केल्याने या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला आहे. महाड आगारातून आतापर्यंत ७० बसेस परतीच्या प्रवासाला बुकिंग झाल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून दिली आहे.

महाड, आंबेत आणि पोलादपूर या ठिकाणाहून या बसेस बुकिंग झाल्या आहेत. आंबेतमधून दोन बोरिवली, एक नालासोपारा, एक मुंबई, तर पोलादपूरमधून पनवेल, बोरिवली, नालासोपारा, मुंबई, भांडुप या ठिकाणी १६ बसेसच्या बुकिंग झाल्या आहेत. थेट त्यांच्या गावातून एसटी बस परतीच्या प्रवासाला उपलब्ध होणार असल्याने गणेशभक्तांनीही समाधान व्यक्त केले आहे. ज्या प्रवाशांना परतीचा प्रवास करायचा आहे, त्यांनी आगाऊ बुकिंग करावे, असे आवाहन महाड आगाराचे वाहतूक निरीक्षक शिवाजी जाधव यांनी केले आहे.

जादा बसचे वेळापत्रक
महाड-भांडुप : दुपारी १ व दुपारी १.१५; महाड-बोरिवली : १२.००, १२.४५, १.००, १.१५, २.४५, २.१५, २.३०, २.४५, ३.००, ३.१५, ४.००, ५.३०, ५.४५; महाड-कल्याण : १०.००, १०.१५; महाड-पुणे : सकाळी ११.००, रात्री १०.००; महाड-पनवेल : ७.३०,९.००,१०.३०,११.००,१२.००,१.००,२.१५, ४.००, रात्री ९.००; महाड-नालासोपारा : १२.००; महाड - मुंबई : ७.१५, १०.००; भाईंदर १.३०, परळ १२.००; आंबेत-बोरिवली : १०.००, १२.००; आंबेत - नालासोपारा १२.३०; आंबेत - मुंबई १.००; पोलादपूर - बोरिवली : १०.००, १०.३०, ११.००, ११.३०, १.४५; पोलादपूर-मुंबई : ८.००, ८.३०; पोलादपूर - नालासोपारा १०.४५, १.००, २.३०; पोलादपूर-पुणे : ९.००; पोलादपूर-ठाणे ७.१५, ७.४५, २.१५, २.४५.
* या वेळापत्रकानुसार अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी महाड आगारात संपर्क साधावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HIV injection attack : लग्न मोडलं… सूडाने पेटलेल्या तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही बाधित रक्ताचं इंजेक्शन; संपूर्ण प्रकरण काय?

LPG Connection Rules : ...तर 'या' ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Katha Arunachi Marathi Play : मिलिंद शिंदे यांची 'कथा अरुणाची' नाटकातील संघर्षमय यात्रा

कुंभ राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): मंगळ-बुध युतीचा प्रभाव, गुढीपाडव्यापासून शुभ संकेत

New Marathi Book : मराठी भाषेच्या वर्तमानावर डॉ. सुधीर रसाळ यांचे परखड चिंतन

SCROLL FOR NEXT