Corona Patients
Corona Patients Sakal media
मुंबई

मुंबईत कोरोना रुग्णांची धडकी भरवणारी वाढ; जाणून घ्या सविस्तर माहिती

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत नवीन वर्षाच्या पाहिल्याच दिवशी चिंता वाढली आहे. आजही कोरोना संख्येचा स्फोट झाला असून सर्वत्र पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे.आज 6347 नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर (corona new patients) पडली आहे त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 7,91,457 वर पोचली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या (corona active patients) 22334 झाली आहे. आज बाधित झालेल्या रुग्णांमध्ये 5712 रुग्ण लक्षणविरहित आहेत. तर आज कोरोनामुळे एक जणांचा मृत्यू झाला आहे. (More than six thousand corona new patients found in Mumbai )

विषेश म्हणजे मुंबईत कोरोनातून बरे झालेल्यांचा दर 97 टक्क्यांहून 95 टक्के पर्यंत खाली आला आहे. तर मुंबईतील सील बंद इमारतीची संख्या 157 एवढी आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी 389 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. एकूण उपलब्ध रुग्णशैय्यांपैकी 9 टक्के रुग्णशय्यांवर रुग्ण दाखल आहेत. शुक्रवारी शून्य मृत्यूंची नोंद झाल्या नंतर आज 1 रुग्ण दगावल्याची नोंद झाली.

मृतांचा एकूण आकडा 16,377 वर पोचला आहे. कोविड वाढीचा दर वाढून 0.28 टक्के झाला आहे.आज 451 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,50,158 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.आज दिवसभरात 47,978 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,37,18,240 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT