Corona patient sakal media
मुंबई

मुंबईत नव्या रुग्णसंख्येत किंचीत घसरण; ६ जणांचा मृत्यू

नरेश शेंडे

मुंबई : मुंबई नव्या कोरोना रुग्णांचा (corona patients) आलेख चढता असून दिवसभरात १३७०२ नव्या रुग्णांची (corona new patients) भर पडली आहे. तर ६ कोरोना रुग्णांचा मृत्यू (corona deaths) झाला आहे. मृत झालेल्या रुग्णांपैकी ५ जणांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये पाच पुरुषांसह एका महिलेचा समावेश आहे. काल बुधवारी १६४२० रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मंगळवारी मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा 11, 647 इतका नोंदविण्यात आला होता. (More than thirteen thousand new corona patients found in mumbai today)

दुसरीकडे राज्यातही नव्या कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. तर गेल्या ४८ तासांत मुंबईत ३२९ पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण १०,३२३ पोलीस पॉझिटिव्ह आढळले असून, एकूण १२६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर ११०२ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबईत दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी एकूण ८७१ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाच्या २०८४९ रुग्णांनी कोविडवर मात केली असून मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ८८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसंच मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी हा ३६ दिवसांवर पोहोचला आहे. महाराष्ट्रात कोविड रुग्णांची वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लोकांनी निर्बंध शिथिल करण्याची अपेक्षा करू नये. पण घाबरण्याची गरज नाही. असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''अंतिम निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचाच'', सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार का? मुख्यमंत्री काय म्हणाले?

Pune Police : पुणे शहरात पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; वरिष्ठ पदांवर सहा अधिकाऱ्यांची नेमणूक

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागावर दि. ०१.०२.२०२६ रोजी मेगा ब्लॉक

Pune Accident: हडपसरमध्ये पुन्हा अपघात; टँकरने धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू, मृताची ओळख पटली नाही

Land Measurement: अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा! जमीन मोजणीचे कठोर नियम शिथिल; महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT