fraud
fraud esakal
मुंबई

नवी मुंबई : एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्यांची फसवणूक; 3७ लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : कडधान्याच्या व्यापाऱ्याची फसवणूक (Fraud crime) करणाऱ्या एकाने खोट्‌या नावाने एपीएमसी मार्केटमधील (APMC Market) एका धान्य व्यापाऱ्याकडून तांदूळ व डाळींची खरेदी केली. आणि तब्‍बल ३७ लाख ७० हजारांचा गंडा (Money fraud) घातल्‍याचे उघडकीस आले आहे. रोडसिंग चदाना असे त्‍याचे नाव असून त्याने एपीएमसी मार्केटमधील अनेक व्यापाऱ्यांची फसवणूक करून लाखोंची फसवणूक केली आहे. एपीएमसी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल (Police complaint filed) केला आहे.

एपीएमसीतील दाणा मार्केटमध्ये महेश जानी हे एम.बी.सोल्यूशन या नावाने कडधान्यांचा घाऊक व्यापार करतात. वर्षभरापूर्वी रोडसिंग चदाना याने मितेश भट याने एजंटच्या माध्यमातून महेश यांच्याशी ओळख करून घेतली. यावेळी त्‍याने आपले नाव चेतन राजपूत असल्याचे व कोलाड येथे श्रीनाथजी ट्रेडिंग या नावाचे दुकान असल्याचे सांगितले होते. महेश यांच्यासोबत कडधान्याचा व्यापार करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्‍यांनी कोलाड येथे जाऊन त्याच्या दुकानाची पाहणी केल्‍यावर एकत्रित व्यवसाय सुरू केला.

सुरुवातीला रोडसिंगने याने महेश यांना मालाचे पैसे वेळेत दिले. त्यानंतर मे २०२१ मध्ये रोडसिंगने कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन लागणार असल्याचे सांगून मोठ्या प्रमाणात कडधान्य पुरविण्यास सांगितले. तसेच सदर मालाची रक्कम त्यांना १० ते १५ दिवसांत देण्याचे कबूल केले. त्यामुळे महेश जानी यांनी मे महिन्यामध्ये त्याला एकूण ४८,४४५ किलो वजनाचा ३७ लाख ७० हजार रुपये किमतीचा तांदूळ व डाळीचा पुरवठा केला. मात्र त्यानंतर तो पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. महेश यांनी एपीएमसी मार्केटमधील काही व्यापाऱ्यांना रोडसिंगचा फोटो दाखविला असता, त्याचे नाव चेतन राजपूत नसून तो रोडसिंग चदाना असल्याचे समजले. महेश यांनी कोलाडमध्ये जाऊन रोडसिंगकडे पैसे मागितले असता, त्‍याने देण्यात नकार दिला. अखेर महेश यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दिवाणी स्‍वरूपाचे १४ खटले दाखल

रोडसिंग चदाना याने महेश जानी यांच्या प्रमाणेच एपीएमसी मार्केटमधील यमुना ट्रेडर्स (२ लाख ९० हजार), डी.एन.ट्रेडर्स (३ लाख ४९हजार), काली महाकाली मसाला ॲण्ड ड्रायफ्रुट (१० लाख ३२ हजार), श्री दर्शन ट्रेडींग कंपनी (२ लाख ९० हजार), महाकाल ऍग्रो (१ लाख ९२ हजार), सिद्धेश्वर स्पाईसेस-(३ लाख ४७ हजार) या कंपनीच्या व्यापाऱ्यांकडून माल घेऊन रक्कम न देता फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्‍याच्यावर ठाणे, पुणे, रोहा व इतर भागात फसवणुकीचे गुन्हे दाखल असून दिवाणी स्वरूपाचे एकूण १४ खटले दाखल असल्याचे समजते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs LSG Live Score: अर्धा संघ माघारी परतला, पण पुरनची एकाकी झुंज; अवघ्या 20 चेंडूत झळकावलं अर्धशतक

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

Table Tennis: मनिका बत्राने रचला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी बनली पहिलीच भारतीय महिला टेबल-टेनिसपटू

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

SCROLL FOR NEXT