मुंबई

मुंबईत कहर! गेल्या 24 तासात 2389 नव्या कोरोना रुग्णांची भर; वाचा इतर सविस्तर आकडेवारी

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत बाधित रुग्णांचा आकडा गुरुवारी (ता. 17) दोन हजारांच्या वर गेला असून, 2,389 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,78,275 झाली आहे. आज 43 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 8,320 वर पोहोचला आहे. आज दिवसभरात 1,173 रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने रुग्ण बरे होण्याचा दर हा 77 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत आज नोंद झालेल्या 43 मृत्यूंपैकी 31 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 32 पुरुष, तर 11 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 43 रुग्णांपैकी दोघांचे वय 40 वर्षांखालील होते. तर 28 रुग्णांचे वय 60 वर्षांवर होते; तसेच 13 रुग्ण 40 ते 60 वर्षांदरम्यान होते.
आज 1,173 रुग्ण बरे झाले असून, आजपर्यंत 1,36,739 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 55 दिवसांवर गेला आहे. 10 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान रुग्णवाढीचा दर 1.28 वरून 1.26 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. 16 सप्टेंबरपर्यंत एकूण 9,64,609 कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या. 

18,220 अति जोखमीचे रुग्ण
मुंबईत 590 इमारती आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 9,365 आहे. गेल्या 24 तासांत बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 18,220 अति जोखमीचे रुग्ण आहेत, तर 2,332 रुग्ण कोव्हिड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Cricket: भारताच्या सुवर्णपदकाच्या शर्यतीला होणार सुरुवात! 'या' संघाविरुद्ध क्वार्टर-फायनलचा सामना, पाहा Schedule

Leg Cramps: रात्री पायात तीव्र कळ; स्नायू आखडतात अन् झोप उडते! जाणून घ्या शरीरातील पाण्याची कमतरता की गंभीर आजार?

Indrayani Express: इंद्रायणी एक्सप्रेस बालकासाठी थांबली; वेळेवर उपचाराने जीव वाचला

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल 18 लाख एरियर? काय आहे चर्चेतील गणित? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात INDIA आघाडी एकवटणार? 'या' तारखेला दिल्लीत मोठी बैठक

SCROLL FOR NEXT