मुंबई

मुंब्य्रातील मशिदीबाबत सर्वसहमतीने घेण्यात आला "हा" निर्णय

सकाळ वृत्तसेवा

ठाणे: मुंब्रा- कौसा भागात पहिला कोरोनाग्रस्त रूग्ण आढळल्याने अखेर, या शहरात सर्वसहमतीने मशिदी बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर, 8 एप्रिलला शब-ए-बारातच्या रात्री कब्रस्तानही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. 

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मुंब्रयातील कौसा या भागात शुक्रवारी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. त्यामुळे प्रशाकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. तर सर्वसंमतीने शहरातील मशिदी बंद ठेवण्यात आल्या आहेत. लॉक डाऊनच्या कालावधीपर्यत मशिद बंद राहणार असल्याचे मशिदीबाहेर फलक लावण्यात आले आहेत. 

काही दिवसांपूर्वी काही मुस्लिम नेत्यांनी घरीच नमाज पडण्याची तसेच, "शबे बारात'ला बाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. महाराष्ट्र सरकारकडूनही अशाच प्रकारचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला मुंब्रावासीयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करण्याचे ठरवले आहे. दरम्यान, यानंतरही काही अतिउत्साही तरूण बिनकामाचे स्त्यावर हुंदडत असल्याने राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) जवानांनी त्यांना चक्क उठाबशा काढण्यास लावले. 
............... 
"शब ए बारात' ला कब्रस्थान बंद 
मुस्लीम समाजात आपल्या पूर्वजांच्या आठवणी जागवण्यासाठी तसेच, पुर्वजांना अभिवादन करण्यासाठी "शब ए बारात मशिद व कब्रस्थानात रात्र जागवण्याची परंपरा आहे. यंदा एप्रिल महिन्याच्या आठ तारखेला शब-ए-बारात आहे.या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलिसांनी सर्व मशिदीमधील मौलानाची बैठक घेऊन 8 एप्रिलच्या रात्री कब्रस्तान आणि मशीद बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.त्या आवाहनाला मुंब्रयातील मुस्लिम धर्मियांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.त्यानुसार, मुंब्रयातील सातही कब्रस्तान आठ एप्रिलच्या रात्री बंद ठेवण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT