मुंबई

रायगड जिल्ह्यात लवकरच कडाक्याची थंडी

अजित शेडगे

माणगाव : ५-१० वर्षांपूर्वी परतीच्या पावसानंतर अवघ्या दोन - चार आठवड्यांत रायगड जिल्ह्यात गुलाबी थंडी जाणवत होती. ते दिवस आता सरले आहेत. यंदा तर तापमानाचा पारा २० अंश सेल्सिअसपर्यंत येण्यासाठी चक्क डिसेंबरचा दुसरा आठवडा उजाडला असून दत्तजयंतीच्या मुहूर्तावर हा प्रत्येकाला हवाहवा वाटणारा हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात दोन दिवस किमान तापमान १७ अंश सेल्सियस आहे. येत्या काही दिवसांत तापमान १५ अंश सेल्सियस पेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज आहे. 


पाससाळा लांबल्याने थंडीचा हंगाम सुरू होण्यास एक - दोन आठवडे उशीर होईल, असा अंदाज हवामान विभागाचा होता; परंतु हा अंदाजही फोल ठरला असून डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत थंडीची चाहूल लागत नव्हती. त्यामुळे वातावरणात बदल झाल्याची चर्चा सुरू होती; मात्र आता हवामान बदलले आहे. वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. बहुतांश ठिकाणी सकाळी दाट धुके दाटत आहे. किमान तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. हा हंगाम फेब्रुवारीपर्यंत राहील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. दरम्यान, काही दिवसांत कडाक्याची थंडी  पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

उकळत्या पाण्यात बसला मुलगाउकळत्या पाण्यात बसला मुलगापावसाळा सरल्यापासून थंडीची प्रतीक्षा होती. ११ डिसेंबरपासून हवामान अचानक बदलले. थंडी जाणवू लागली आहे. काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी घसरेल, अशी अपेक्षा आहे. 
-  देगावकर, माणगांव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

मुलीचा हात ओढणं किंवा शिट्टी वाजवणं हा लैंगिक...; मद्रास हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं काय सांगितलं?

Land Deal Probe: निवडणुकीनंतर महिनाभरात कोट्यवधींची जमीन खरेदी? देवदत्त निकम यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT