मुंबई

Palghar Crime: मायलेकी झोपलेल्या असताना अज्ञाताने केला प्राणघातक हल्ला!

रात्रीच्या अंधारात निद्रिस्त मायलेकींवर घातक हल्ला; मोखाड्यात भीतीचं वातावरण

सकाळ वृत्तसेवा

मोखाडा तालुक्यातील  बादलपाडा येथील यशोदा पांडुरंग झुगरे ( 48 ) आई , गुलाब पांडुरंग झुगरे ( 24 ) मुलगी या दोघी घरात झोपलेल्या असतांना, अज्ञात हल्लेखोराने मागच्या बाजूने खिडकीतून प्रवेश करत मायलेकींवर टोकदार शस्राने प्राणघातक हल्ला करुन पळ काढला आहे.या घटनेबाबत मोखाडा पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरा विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.   

  मोखाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशोदा आणि गुलाब घरात झोपलेल्या असतांना,  15  फेब्रुवारी ला गुरूवारी पहाटे  4 : 30 च्या सुमारास मागील बाजूच्या खिडकीतून अज्ञात हल्लेखोराने प्रवेश केला. बाहेर हॉलमध्ये झोपलेल्या मायलेकी खिडकीच्या आवाजाने उठल्या आणि त्यांनी आरडाओरडा केला.

त्यावेळी त्या अज्ञात इसमाने टोकदार हत्याराने यशोदा झुगरे यांच्या पाठीत वार केला. आईला सोडवायला गेलेल्या मुलगी गुलाब ला देखील या अज्ञात इसमाने पाठीवर टोकदार शस्राने वार करुन जखमी केले आहे.

या दोघींवर खोडाळ्यातील खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात आले आहेत. जखमी मायलेकींच्या तक्रारी वरून टोकदार शस्राने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी, अज्ञाता विरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप गिते करत आहेत. 

         मोखाडा तालुक्याला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही.मात्र प्रेतांची विल्हेवाट लावणे, हल्ला करणे असे प्रकार तालुक्यात या पंधरवाड्यात लागोपाठ घडत असल्याने गुन्हेगारी जगापासून कोसो दुर असलेल्या तालुक्यातील निष्पाप नागरीक धास्तावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT