crime esakal
मुंबई

Mumbai Crime : मुलाविरोधात आईची पोलिसात तक्रार; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरच आरोपी मुलाचा हल्ला

मुलगा त्रास देतो म्हणून आईने पोलिसांकडे तक्रार केली असता, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपी मुलाला टिळक नगर पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - गुरुवारी मुलगा त्रास देतो म्हणून आईने पोलिसांकडे तक्रार केली असता, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपी मुलाला टिळक नगर पोलिसांनी अटक केली. राहूल भोसले असे आरोपी मुलाचं नाव असून या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आरोपी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

28 वर्षीय आरोपी राहुल बाळू भोसले हा चेंबूर येथील सिद्धार्थ नगरमधील रहिवासी आहे. आरोपी पैशांसाठी सतत आईला त्रास देत होता. गुरूवारी आरोपी मुलाने परत एकदा पैशाची मागणी केली. परंतु आईने पैसै देण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यात वाद झाला.

वाद विकोपाला गेल्यामुळे आईने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मदत मागितली. त्यानुसार स्थानिक टिळक नगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी आरोपी मुलाला पहिल्यांदा सामंजस्याने समजवण्याचा प्रयत्न केला.

परंतु आरोपीने त्या बदल्यात पोलीसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यासोबतच स्थानिकांना तसेच पोलिसांना शिवीगाळ धमकी देऊ लागला. आरोपीने केलेल्या दगडफेकीत एक पोलीस हवालदार जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि टिळक नगर पोलीस ठाण्यात आणले.

सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. दगडफेकित जखमी झालेल्या पोलिसावर रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संघाच्या शाखेत अत्याचाराचे आरोप, आत्महत्या प्रकरणावर RSSने दिली प्रतिक्रिया; घटना दुर्दैवी पण...

भारत महान देश, माझा मित्र तिथं टॉपचा नेता; शरीफ यांच्यासमोर ट्रम्पकडून PM मोदींचं कौतुक

Kolhapur Jilha Parishad : करवीरमध्ये जल्लोष, हातकणंगलेत निराशा; चंदगड भुदरगडमध्ये महिलाराज, गडहिंग्लजमध्येही दिलासा

Weather Update : 'मॉन्सून'बाबत महत्त्वाची अपडेट! महाराष्ट्रातील बहुतांश भागांतून पावसाची माघार; हवामान विभागानं काय सांगितलं?

Latest Marathi News Live Update : पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात! फटाक्यांची दुकानं राहणार २४ तास खुली

SCROLL FOR NEXT