Hsc Exam sakal
मुंबई

Hsc Exam Result: आई आणि पोराने एकत्र दिली बारावी, आईने पटकवले अधिकचे गुण

मुलगा चांगल्या मार्गाने पास झाला याचा मला अभिमान आहे. याचबरोबर मी ही पास झाले याचा मला आनंद आहे | Mother and son passed 12th together...

Chinmay Jagtap

Hsc Exam Result: आईच्या जिद्दीची कहाणी कशी असावी याचा प्रत्यय आपल्याला गीता पासी यांच्याकडे बघून येतो. याचे कारण म्हणजे कुर्ला येथे राहणाऱ्या त्या आणि त्यांच्या मुलगा दोघेही बारावीच्या परीक्षेला बसले आणि दोघेही बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यात खास बाब म्हणजे मुलापेक्षाही आईने जास्त गुण मिळवले आहेत (latest Marathi news)

1966 साली त्यांनी पहिल्यांदा दहावीची परीक्षा दिली होती. मात्र तेव्हा त्या तब्बल तीन ते चार विषयांमध्ये नापास झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचं लग्न झालं. संसाराची जबाबदारी आली, कुटुंबाची जबाबदारी आली. यामुळे त्या कधीही परीक्षा देऊ शकल्या नाहीत. अखेर दोन वर्षांपूर्वी त्यांनी दहावीची परीक्षा दिली आणि आज त्या बारावीच्या परीक्षेतही पास झाले आहेत.(12 exam result in maharashtra )

गीता यांचा मुलगा आर्यन याला ५२ टक्के पडले असून गीता यांना ५३ टक्के पडले आहेत. गीता यांनी नेहमीच अभ्यासाला पसंती दिल्याने आर्यनही विद्यान शाखेत चांगल्या गुणांनी पास झाला आहे. गीता म्हणतात आर्यन चांगल्या मार्गाने पास झाला याचा मला अभिमान आहे. याचबरोबर मी ही पास झाले याचा मला आनंद आहे.(mumbai hsc result)

गीता म्हणतात की, बारावीच्या टेन्शनमुळे त्यांना झोप लागत नव्हती, सकाळी पाच वाजता आपोआप जाग यायची. त्या आणि त्यांचा मुलगा एकत्र बसून अभ्यास करायचे पूर्ण वर्षभर त्यांनी असाच व्यवस्थित अभ्यास केला. अभ्यासाच्या जोरावर आज त्या पास झाल्या आहेत. अभ्यासक्रमाची भीती त्यांना वाटत असे, मात्र पास झाल्याचा प्रचंड आनंद त्यांना होत आहे. मेहनत सार्थकी लागली असे ते म्हणत आहेत. याचबरोबर त्यांच्या या अभ्यासू वृत्तीचं सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT