MP Gajanan Kirtikar criticize Ramdas Kadam  Sakal
मुंबई

Mumbai : रामदास कदम हेच मोठे गद्दार; खासदार गजानन कीर्तिकर यांचा हल्ला

कदम यांनी कीर्तीकर यांच्यावर गद्दारीचा संशय व्यक्त केल्याचे वृत्त आज प्रसिद्ध झाले आहे. त्याला खासदार कीर्तीकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : माझ्यावर गद्दारीचा संशय व्यक्त करणारे रामदास कदम यांनी मालाड विधानसभा निवडणुकीत मला तसेच लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांना पाडण्यासाठी भरपूर प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या तोंडी गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे, असा प्रतिहल्ला खासदार गजानन कीर्तिकर यांनी चढवला आहे.

कदम यांनी कीर्तीकर यांच्यावर गद्दारीचा संशय व्यक्त केल्याचे वृत्त आज प्रसिद्ध झाले आहे. त्याला खासदार कीर्तीकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कीर्तीकर हे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार असून ते सध्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणूक आपणच शिवसेना पक्षातून लढवणार असून आपण साडेतीन लाख मताधिक्याने जिंकून येऊ असा ठाम विश्वासही कीर्तिकर यांनी व्यक्त केला आहे.

रामदास कदम यांचा गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत मालाड मतदार संघातून मला पाडवण्यासाठी त्यांनी भरपूर अयशस्वी प्रयत्न केले. नंतर खेड ते पुणे प्रवासात शरद पवार यांच्या गाडीत बसून रामदास कदम राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत सविस्तर चर्चा करीत होते.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांना पाडण्यासाठीही कदम यांनी भरपूर निष्फळ प्रयत्न केले. महापालिका निवडणुकीत कांदिवली पूर्व प्रभागातून त्यांचा सख्खा भाऊ सदानंद कदम शिवसेनेतून निवडणूक लढत असताना, त्यांना निवडून आणू नका, म्हणून रामदास कदम सर्व कार्यकर्त्यांना दमबाजी करत होते, हे सर्वाना ठाऊक असल्याचेही कीर्तीकर यांनी दाखवून दिले आहे.

सध्या रामदास कदम यांचा मुलगा सिद्धेश कदम याला लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा झाली आहे. त्यामुळे ते खोट्या बातम्या प्रसिद्ध करून वातावरण बिघडवण्याचा निष्कळ प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या दबावतंत्राला शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थारा देणार नाहीत अशी सर्व शिवसैनिकांना खात्री आहे. त्याचमुळे वैफल्यग्रस्त रामदास कदम आदळापट करीत आहेत. पक्ष नेतृत्वाच्या आणि जनतेच्या मनात मुद्दाम संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न रामदास कदम करीत आहेत. त्यांनी हे निष्फळ प्रयत्न थांबवावेत, असा इशाराही कीर्तीकर यांनी त्यांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात; चार वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT