Navneet Rana Ravi Rana Latest Marathi News sakal
मुंबई

...म्हणून राणा दाम्पत्याची आजची रात्र तुरुंगातच जाणार

राणा दाम्पत्याची उद्या सकाळी 9 वाजता सुटका होण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुख्यमंत्र्याचे निवासस्थान मातोश्री समोर हनुमान चालिसेच्या (Hanuman Chalisa) पठनानंतर राजद्रोहाच्या गुन्हाखाली अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाला आहे. परंतु, जामीन मिळूनही राणा दाम्पत्याला आजची रात्र तुरुंगातच घालवावी लागणार आहे. जामिनाची प्रक्रिया बोरिवली न्यायालयात पूर्ण होण्यास विलंब झाल्याने राणा दाम्पत्याला आजची रात्र तुरुंगात काढावी लागणार असून, उद्या सकाळी 9 वाजता या दाम्पत्याची सुटका होण्याची शक्यता आहे. (MP Navneet Rana & MLA Ravi Rana Will Not Released From Jail)

गेल्या 11 दिवसांपासून तुरुंगात

हनुमान चालीसा म्हणण्यावरून झालेल्या वादानंतर समाजात तेढ आणि शांतता भंग केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना काही अटींवर जामीन मंजूर केला होता. मात्र, जामिनाची प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब झाल्याने आजची रात्रही राणा दाम्पत्याला तुरुंगातच काढवी लागणार आहे.

अटी-शर्थींवर सुटका

मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना पाच अटी घातल्या आहेत. यामध्ये रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय तपासात कोणतेही अडथळे आणू नये, असे आदेश न्यायालयाने राणा दाम्पत्याला दिले आहेत. तसेच घटनेशी संबंधित साक्षीदारांवर कोण्त्याही प्रकारचा दबाव न टाकण्याची अटही न्यायालयाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final: टीम इंडियावर ४ मोठे ‘शाप’; न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलून भारत ट्रॉफी जिंकणार का?

Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

ज्जे बात ! नोकरांना माज दाखवणाऱ्या अंशुमनला स्वानंदीने चाबकाने फोडलं ; प्रोमो पाहून प्रेक्षकांना आनंद अनावर

UPSC Success Marathi : अभ्यासातील सातत्य, नियोजन आणि मार्गदर्शनामुळे कोल्हापुरातील कुरुंदवाडच्या ऋषिकेशने UPSC मध्ये ६१ वी रँक

Latest Marathi News Live Update : खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा...

SCROLL FOR NEXT