मुंबई

MPSC Exam Postponed: फेसबुक लाईव्हमध्ये काय म्हणाले मुख्यमंत्री, वाचा सविस्तर

पूजा विचारे

मुंबई: १४ मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एमपीएससीनं याबाबतची घोषणा केली. त्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांचा उद्रेक पाहायला मिळत आहे. परीक्षा पुढे ढकलल्यानं पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूरमध्ये विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. काही दिवसांसाठी एमपीएससीची १४ मार्चची परीक्षा पुढे ढकलत आहोत. उद्या परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

येत्या आठ दिवसांच्या आत MPSC ची पूर्व परीक्षा घेण्यात येईल आणि त्याच्या तारखेची घोषणा शुक्रवारी म्हणजे उद्या जाहीर केली जाईल, असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं. तसंच येत्या आठ दिवसांत परीक्षा होतील हे वचन देतो, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

माझी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांबरोबर चर्चा सुरू आहे. परीक्षा यंत्रणा खूप मोठी आहे. कोरोनाची परिस्थिती अधिक बिकट झाल्याने परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी वेळ लागत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग परीक्षेदरम्यान होऊ नये यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच लस घेतलेले कर्मचारी परीक्षेसाठी देण्याची सूचना मी केली आहे. त्यामुळे यंत्रणेतल्या सर्वांची कोरोना चाचणी होणं आवश्यक असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

विद्यार्थ्यांच्या भावनांशी मी सहमत आहे. केवळ काही दिवसांसाठी १४ तारखेची परीक्षा पुढे ढकलत आहोत. मुख्य सचिव आणि एमपीएससीच्या प्रमुखांना तारखांचा घोळ मिटवून उद्याच तारीख जाहीर करा, अशी सूचना केली आहे. येत्या आठवड्याभरात ही परीक्षा होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याचं कारण कोविडच आहे. परीक्षेची व्यवस्था करावी लागते, यासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार आहे. त्यांची चाचणी करणं गरजेचं आहे. ज्यांना लस दिली आहे, त्यांनाच येथे नेमलं जाईल. ही माझी सूचना आहे, असं आज मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलले आहे. 

यावेळी MPSC ची पूर्वपरीक्षा अनेकदा पुढे ढकलल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वयोमर्यादा उलटून जाण्याची भीती आहे. मात्र आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. परीक्षा देताना विद्यार्थ्यांना वयोमर्यादा आडवी येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

तसंच उगाच कोणी भडकवतोय म्हणून भडकून जाऊ नका. आपला अभ्यास सुरु ठेवा. मी तुम्हाला वचन देतो की, येत्या आठवड्याभरात परीक्षा होईल, असंही सांगायला मुख्यमंत्री विसरले नाहीत.

Mpsc exam 2020 Postponed cm Uddhav Thackeray facebook live

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT