मुंबई

ST बस धडकली महाकाय सिमेंट मिक्सरला, वाशीत भीषण अपघात

सुमित बागुल

वाशी : नवी मुंबईत एक भीषण अपघात झालाय. एक MSRTC ची बस थेट सिमेंट मिक्सर वाहनाला धडकली आहे. ही धडक एवढी जोरदार होती की या धडकेनंतर सदर बसचा पुढील भाग पूर्णपणे मोडकळीस आलाय. या अपघातात एकूण पाच जण जखमी झाले आहेत, ज्यामध्ये कंडक्टर आणि बस चालकाचा देखील समावेश आहे. सदर अपघात हा आज सकाळी नवी मुंबईच्या वाशी ब्रिजवर घडला आहे.  

या अपघातामुळे वाशी ब्रिजवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी वाशी ब्रिजवरील वाहतूक कोंडी झाल्यामुळे तब्बल अर्धा तास वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरु होती.

सदर अपघातग्रस्त बस आणि सिमेंट मिक्सर हटवण्यासाठी वाशी वाहतूक पोलिसांकडून हायड्रॉलिक क्रेनचा वापर केला गेला. हायड्रॉलिक क्रेनचा  करून दोन्ही वाहनांना रस्त्यावरून हटवण्यात आलं. या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना वाशीमधील 'नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन' च्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सदर अपघाताबाबतची माहिती वाशीच्या ट्राफिक इन्स्पेक्टर भानुदास खटावकर यांनी दिली.  

MSRTC bus rams into cement mixer on vashi creek bridge five people injured in accident  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kini Toll Plaza Traffic : ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला विलंब, किणी टोलनाक्यावर पाच किलोमीटर वाहनांच्या रांगा; पुणे बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

Rajgad ST Bus: राजगड तालुक्यात एसटीचा खोळंबा; बस बंद पडल्याने ८० प्रवाशांना चार तास ताटकळावे लागले

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या दोन वनडेत श्रेयस अय्यर कर्णधार; शुभमन गिल-गौतम गंभीर का नसणार संघात?

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणाचे बीड कनेक्शन; शिरूरच्या प्रकाश मिसाळला अटक, आरोपींची संख्या १८ वर

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

SCROLL FOR NEXT