एसटी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनात शासकीय अधिकाऱ्यांचा खोडा Sakal
मुंबई

MSRTC : एसटी प्रवासी कराची ७८० कोटींची रक्कम भरा, मगच वेतनासाठी पैसे देऊ; शासकीय अधिकाऱ्यांचा खोडा

एसटी महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांना दर महिन्याच्या सात तारखेला वेतन मिळते.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News :  एसटी महामंडळातील कर्मचारी व अधिकारी यांना दर महिन्याच्या सात तारखेला वेतन मिळते. परंतु संप व कोरोनापासून अनेकदा वेळेवर वेतन होत नाही. संपानंतर मात्र न्यायालयात दिलेल्या आश्वासनाचे पालन होत नाही.

या महिन्यात मात्र दहा तारीख पर्यंत वेतन मिळेल की नाही ? अशी शंका निर्माण झाली आहे. कारण प्रवाशीकराचे ७८० कोटी रुपये अगोदर शासनाला भरणा करा. वेतनाला कमी पडणारी रक्कम देऊ असा खोडा सरकारी अधिकाऱ्यांनी घातला असून यातून शासनाची दुटप्पी भूमिका उघड होत असल्याचा स्पष्ट आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

बरगे यांनी सांगितले की, एकीकडे वेतनाला व खर्चाला कमी पडणारी रक्कम एसटीला दर महिन्याला देऊ असे लेखी आश्वासन संपानंतर शासनाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने उच्च न्यायालयात दिले होते.पण दुसऱ्या बाजूला मात्र त्यात दर महिन्याला काही ना काही खोडा घालण्याचे काम सरकारी अधिकारी करीत आहेत.

गेल्या दीड वर्षापासून प्रवासीकराची शासनाला देय असलेली ७८० कोटी रुपयांची रक्कम शासनाला तात्काळ भरा अन्यथा या महिन्यात शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येणार नाही. अशी अट घातली आहे.

तसेच वेतन व इतर खर्चाल कमी पडणाऱ्या निधीची शासनाकडे मागणी करण्यात आलेली फाईल एसटीकडे परत पाठविली आहे. त्यामुळे या महिन्यातील वेतन कर्मचाऱ्यांना द्यायचे कसे? असा प्रश्न एसटी समोर निर्माण झाला आहे.

खरे तर उच्च न्यायालयात शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार खर्चाला कमी पडणारी सर्व रक्कम दर महिन्याला देऊ असे स्पष्ट कबूल केले असताना असे गैर लागू मुद्दे उपस्थित केले जात आहेत. प्रवासीकर ही रक्कम सुद्धा खर्चाला कमी पडणारी असून ती रक्कम सुद्धा शासनाने दिली पाहिजे.

किंवा शासनाने त्यांच्या स्वतःच शासनाच्या खात्यात थेट वर्ग केली पाहिजे. पण सरकारी अधिकारी नेहमी काहीना काही अडचणी निर्माण करीत आहेत. निधी देण्याची ऐपत नव्हती तर न्यायालयात आश्वासन दिले का? असा प्रश्नही बरगे यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत आज ठाकरेंचा मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही सहभागाची शक्यता

Electric Shock Farmer: दुष्काळात भातपीक वाचवण्याची धडपड ठरली जीवघेणी; शेतात पाणी देताना वीजप्रवाहाच्या संपर्कात येऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Horoscope 2027: २०२७ ठरणार खास! नोकरी, व्यवसाय अन् पैशांच्या बाबतीत मिळू शकतात मोठ्या संधी; ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार म्हणे

Sunetra Pawar: ‘स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवा, अजितदादांचं नाव वापरू नका’; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना टोला

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

SCROLL FOR NEXT