file photo
file photo 
मुंबई

मु्ंबईत रेल्वेमार्गावर माेबाईल चोरट्यांचा सुळसुळाट 

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर चोरांचा सुळसुळाट वाढला असून दोन दिवसांत जुईनगर आणि नेरूळ रेल्वेस्थानकाजवळ लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे महागडे मोबाईल फोन चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे.
 
शुक्रवारी (ता. 5) रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास आनंदराव माने नेरूळ रेल्वेस्थानकावरून लोकलने पनवेलला जायला निघाले. दरम्यान, लोकलने वेग घेताच फलाटावरील चोरट्याने माने यांच्या हातावर फटका मारला. त्याच्या हातातील 22 हजार रुपये किमतीचा मोबाईल खाली पडल्याने चोरट्याने मोबाईल उचलून पळ काढला. माने यांनी दुसऱ्या दिवशी वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

जुईनगर रेल्वेस्थानकाजवळ रविवारी (ता. 7) रात्री पावणेनऊच्या सुमारास कोपरखैरणे ते नेरूळ प्रवास करणाऱ्या मुश्‍ताक इब्राईम शेख या तरुणाच्या हातावर जुईनगर रेल्वेस्थानकाजवळ चोरट्याने फटका मारला. मुश्‍ताकच्या हातातील 14 हजार रुपये किमतीचा मोबाईल खाली पडल्यावर चोरट्याने मोबाईल फोन उचलून पळ काढला. या वेळी लोकलने वेग घेतल्याने त्यांना काहीच करता आले नाही. सोमवारी मुश्‍ताक यांनी घटनेची तक्रार दाखल केली. वाशी रेल्वे पोलिसांनी दोन्ही प्रकरणात अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT