मुंबई

मोठी बातमी:  CCTVतील 'ती' व्यक्ती सचिन वाझेच, NIA म्हणते...

पूजा विचारे

मुंबई:  सचिन वाझे प्रकरणात आता आणखी एक मोठा गौप्यस्फोट झाला आहे.  काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. तपास यंत्रणांना मिळालेल्या या फुटेजमध्ये कटात सहभागी असलेली इनोव्हा कार बऱ्याच वेळा अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात फेऱ्या मारताना दिसली होती. त्यावेळी या ड्रायव्हरने ओळख लपवण्यासाठी पीपीई किट घातल्याचे दिसून आले होते.  ती व्यक्ती सचिन वाझेच असल्याचा एनआयएच्या चौकशीत सचिन वाझे आणि त्यांच्या एका सहकाऱ्याच्या चौकशीतून स्पष्ट झालं आहे. 

सीसीटीव्ही मधला माणूस वाझेच आहे यावर आमच्याकडे पक्के पुरावे असल्याची माहिती एनआयनं दिली आहे. मर्सिडीज गाडीतून जी बाटली सापडली ती केरोसीनची असून त्या केरोसीनने गुन्ह्यातील पुरावे जाळण्यात आले असल्याचंही एनआयएचं म्हणणं आहे.

आतापर्यंतच्या तपासात हे सगळं कारस्थान सचिन वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केल्याचं समोर आलं आहे. पूर्वीचे अस्तित्व पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण हे केलं असं वाझे चौकशीत सांगताहेत. मात्र एनआयए यापुढचा तपास सुरूच ठेवणार असून  एनआयए प्रकरणाच्या मुळाशी जाणार असल्याचंही समजतंय. 

आज आणखी काही जणांना चौकशीला बोलावणार असल्याचीही माहिती एनआयएनं दिली आहे. या मर्सिडीजच्या व्यतिरिक्त आणखी एक मर्सिडीज आणि स्कोडा गाडी एनआयएच्या रडारवर आहे जी सचिन वाझे वापरत होते.

दरम्यान, सचिन वाझे तपासाला सहकार्य करत नसल्याची बातमी समोर आली होती. 
गुन्ह्यात संदर्भात अनेक पुरावे सचिन वाझेंनी नष्ट केल्याचा NIA ला संशय आहे. तसंच
जैश उल संदर्भातील लिंक बाबत वाझेंकडे चौकशी केली जात आहे. वाझे प्रकरणात तपासात सहभागी असलेल्या काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची ही NIA चौकशी करू शकतं. तपासा दरम्यान सचिन वाझे ज्या अधिकाऱ्यांना भेटून या गुन्ह्यांचा तपशील सांगायचे, त्यांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता आहे.  

वाझे हे हिरेनला ओळखत असल्याचं त्यांनी वरिष्ठांना सांगितलं होतं का? ओळख असल्याचे कळाल्यानंतर वाझेंची चौकशी करण्यात आली का ? असे गुन्ह्या संदर्भातले अनेक प्रश्न NIA कडून विचारले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाझे वापरत असलेल्या गाड्यांचा गुप्त अहवाल बनवणार 

सचिन वाझे वापरत असलेल्या,  तसेच पोलिस आयुक्तालयात घेऊन आलेल्या गाड्यांसाठी एक विशेष गुप्त अहवाल बनवण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एनआयएने जप्त केलेली मर्सिडीज कारसह इतर काही गाड्यांचे क्रमांक पोलिसांच्या हाती लागले आहेत. पोलिस आयुक्त कार्यालयाच्या गेटवरील सीसीटीव्ही काम करत नसल्यामुळे अधिकाऱ्यांच्या मार्फत पडताळणी करून अहवाल तयार करण्यात येत आहे. वाझे यांनी अनेक प्रकारांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात  ठेवल्यामुळे मुंबई पोलिस दलाची बदनामी झाली. त्यामुळे पोलिसांनीही त्यांच्या पद्धतीनं त्याची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

जप्त मर्सिडीज कारचे नोंदणी करणं झाले नाही?

एनआयएने काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमधून  स्कॉर्पिओला वापरण्यात आलेल्या दोन नंबर प्लेट, पाच लाखांहून जास्त रोख, कपडे, नोट काऊटिंग मशीन जप्त केले आहेत. सचिन वाझे ही गाडी चालवतं होते, असे एनआयएचे महानिरिक्षक अनिल शुक्ला यांनी सांगितले. दरम्यान जप्त मर्सिडीज कारचे नोंदणीकरण करण्यात आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ही गाडी कोणत्या शोरूममधून वापरण्यासाठी घेतली आहे का? याबाबत एनआयए तपास करत आहे. कारचा तपास प्राथमिक स्तरावर असून नोंदणीकरण झाले की नाही आता सांगणे शक्य होणार नाही. तरी चेसी क्रमांकाच्या मदतीने त्याची पडताळणी करण्यात येईल, असे एका अधिकाऱ्याने  सांगितले.

Mukesh Ambani explosives case CCTV ppe kit man was sachin Waze NIA probe

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Zodiac Prediction 7 to 13 July: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

SCROLL FOR NEXT