मुंबई

Mukesh Ambani: सोनूकडे सापडला 'तो' धमकीचा फोन, जाणून घ्या तो आहे तरी कोण?

पूजा विचारे

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवल्याची जबाबदारी स्विकारणारा जैश-उल-हिंद या संघटनेच्या नावाने आलेला टेलिग्राम संदेश हा तिहार कारागृह परिसरातून आल्याचे सायबर तपासणीत निष्पन्न झाले होते. याप्रकरणी तिहार जेलमधील बराक क्रमांक 8 पोलिसांच्या रडारवर आली होती. दरम्यान आताच समोर आलेल्या माहितीनुसार, इंडियन मुज्जाहिदीन या संघटनेसाठी काम केलेला दहशतवादी तहसीन अख्तर उर्फ सोनू हा सध्या तिहार जेलमध्ये असून त्याच्याजवळ हा मोबाइल सापडल्याचा कळतेय. 

'तिहार च्या बराक ८ मध्ये सोनूला ठेवण्यात आलं होतं. हा फोन आता न्याय वैद्यक प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं कळतेय. गुप्त माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने कारागृह अधिक्षक पथकाने तिहारमध्ये शोध मोहिम राबवली. त्यावेळी हा फोन सोनूजवळ आढळला.

याप्रकरणी गुरूवारी दिल्ली विशेष सेलने तिहार जेलमध्ये शोध मोहिम राबवली. त्यात प्राथमिक पडताळणीत हा क्रमांक तिहार जेलमधूनच वापरण्यात आल्याचे पुढे आले आहे. हा क्रमांक दिल्लीतील राहुवर पुरा येथील जयदिप लोढीया नावाच्या व्यक्तींच्या नावावर असून याच क्रमांवरून जैश-उल-हिंद या संघटनेच्या नावाने आलेला टेलिग्राम संदेश पाठवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या पडताळणीत स्पेशल सेलचे पथक तेथील बराक क्रमांक 8 पर्यंत पोहोचले असून त्यात इंडियन मुजाहिद्दीन, अल कायदा आणि अंडरवर्ल्डशी संबंधित आरोपी ठेवण्यात आले आहेत. 

पिक्चर अजून बाकी आहे, अशा शब्दात या संघटनेच्या वतीने जारी करण्यात आली होती. एका टेलिग्राम मेसेजच्या माध्यमातून जैश-उल हिंदने दावा केला होता. त्यात स्फोटकं ठेवणारे दहशतवादी सुखरुपपणे घरी पोहोचले आहेत. हा केवळ ट्रेलर होतो आणि पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे. यात मुकेश अंबानी यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी देण्यात आलेली बिटकाईनची लिंक बनावट असल्याचे निष्पन्न झाले होते.  या संदेशानंतर सायबर तज्ज्ञांच्या मदतीने या टेलिग्राम संदेशाची तपासणी करण्यात आली असून तो तिहार कारागृह आणि आसपासच्या परिसरातून पाठवण्यात आल्याचे तांत्रिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. सुरुवातीला संबंधित संदेश हरि नगर परिसरातून आल्याचा संशय होता. पण आता हा संदेशाबाबतचा तपास तिहार कारागृहापर्यंत पोहोचला आहे.

इनोव्हाच्या कार मालकाचा शोध सुरू

अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या कारला मदत करणा-या इनोव्हा कारपर्यंत तपास येऊन थांबला आहे. या कारच्या मालकाबाबतची माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचे कार ठाण्यातील एका व्यावसायिकापर्यंत जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्या दिशेने सध्या एनआयएचा तपास सुरू आहे.

Mukesh Ambani Threating Tihar Jail mobile phone Sonu Indian Mujahideen terrorist

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT