आर्यन खानच्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची सुनावणी आज पार पडली. यामध्ये दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद सुरू होता. आर्यनच्या बाजूने अॅड. मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. टीममधील काही वकिलांना आणण्यासाठी आर्यनचे वकील सतिश मानेशिंदे यांना न्यायालयाबाहेर यावे लागले.
मात्र, युक्तीवाद सुरू असताना न्यायमूर्ती सांबरे यांनी व्हॉट्सअॅप चाट्सबद्दल माहिती मागितली. यावेळी अॅड. अमित देसाई यांनी न्यायालयाला या संभाषणाची माहिती दिली. हे चाट्स आर्यन आणि खान आणि अचितमधील होते. अचितने आर्यनला ड्रग्ज पुरवल्याचा एनसीबीचा दावा आहे. तसेच त्याच्यासोबत आर्यनचं ड्रग्जबाबत बोलणं झाल्याचंही सांगण्यात आलं.
दरम्यान, अचित आणि आर्यनमध्ये झालेल्या संभाषणात पोकर खेळण्याचा उल्लेख होता. ते ऑनलाईन पोकर खेळण्याबद्दल बोलत होते. यावर आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयासमोर रम्मीचा उल्लेख केला. सर्वोच्च न्यायालयाने पत्त्यांची रम्मी खेळणे हा कौशल्यपूर्ण खेळ असल्याचं म्हटलं होत, याची आठवण करून दिली.
आजकाल अनेक गेमिंग ऑनलाइन पद्धतीने होत आहे. लॉकडाऊनच्या काळात बरीच मुलं ऑनलाईन खेळत होती. त्यावर न्यायालयाकडूनही विचार केला जात आहे, असे देसाई देखील म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.