railway esakal
मुंबई

Mumabi Crime : कल्याण रेल्वे स्थानकावर तिकीट दलालांची दादागिरी

मेल एक्सप्रेसच्या तिकिटासाठी रांगेत उभे असलेल्या प्रवाशाला दलालांकडून मारहाण

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - मेल एक्सप्रेसचे तिकीट घेण्यासाठी दिवसभर रांगेत उभे असलेल्या एका प्रवाशाला तिकीट दलालांनी सोमवारी रात्री मारहाण केल्याची घटना कल्याण रेल्वे स्टेशन परिसरतील तिकीट आरक्षण केंद्रावर घडली आहे. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

या घटनेमुळे तिकीट दलालांची दादागिरी समोर आली आहे. सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या दलालांवर कठोर कारवाईची मागणी आता केली जात आहे. सुट्ट्यांमध्ये कल्याण हून परराज्यात जाण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात कल्याण रेल्वे स्थानकावर वर्दळ असते. सामान्य प्रवाशाला तिकिटासाठी वणवण करावी लागते अनेकदा तर पूर्ण दिवस तिकीट आरक्षण केंद्रावर रांगेत उभे राहावे लागते तरीही तिकीट मिळत नाही.

दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जाते. तत्काळ तिकीट मिळवण्यासाठी दलालांकडून तिकीट खिडक्यांसमोर एकापेक्षा जास्त दलाल उभे केले जातात. त्यामुळे प्रवाशांना तिकीट मिळत नाही. प्रवाशांनी यावेळी दलालाविरोधात आवाज उठवल्यास या दलालांकडून दादागिरी व मारहाण करण्यात आल्याच्या अनेक घटना या आधी देखील कल्याण रेल्वे स्टेशन आरक्षण केंद्रात घडल्या आहेत.

असाच एक प्रकार काल घडला. कल्याणहून बनारस ला जाण्यासाठी संतोष राय हा तरुण सलग तीन दिवस आरक्षण केंद्रात रांगेवर उभा होता. पहिल्या दिवशी त्याचा 50 वा नंबर होता तिकीट मिळाले नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल त्याचा 11 वा नंबर होता. रात्री अकराच्या सुमारास संतोष रांगेत उभा असताना काही जण त्या ठिकाणी आले व थेट रांगेत घुसले. त्यांनी स्वतःचे नंबर लावायला सुरुवात केली.

संतोष राय यांनी विरोध केला आणि व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला मात्र दलालांकडून संतोष याला मारहाण करण्यात आली. त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून मोबाईल मधील व्हिडिओ डिलीट करण्यात आले. या प्रकरणाची कल्याण जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी गंभीर दखल घेतली .दरम्यान या घटनेमुळे तिकीट दलालांची दादागिरी समोर आली असून कल्याण रेल्वे पोलिसांनी सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जातेय.

या प्रकरणात कल्याण जीआरपी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी तक्रार आमच्याकडे आली आहे तपास सुरू असल्याचे सांगितले.कल्याण आर पी एफ चे इन्चार्ज राकेशकुमार शर्मा यांनी ही घटना सोमवारी रात्री घडली कल्याण आरक्षण केंद्र दलाल मुक्त झालं आहे आमच्या परीने दलालांवर योग्य ती कारवाई केली जाईल मात्र कॅमेरेवर बोलण्यास दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी नकार दिलाय .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT