राज्यघटनेची मूळ प्रत मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात जतन करून ठेवण्यात आली आहे. sakal
मुंबई

मुंबई: ‘सिद्धार्थ’मध्ये बाबासाहेबांचा वारसा जतन!

राज्यघटनेची प्रत सुरक्षित

प्रशांत कांबळे :सकाळ वृत्तसेवा

मुंबई: वंचितांना न्याय्य हक्क मिळवून देणाऱ्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेची मूळ प्रत मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात जतन करून ठेवण्यात आली आहे.आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिल्यानंतर त्याच्या प्रती घटना समितीच्या सदस्यांना दिल्या होत्या. बाबासाहेबांनी त्यांच्याकडील प्रत सिद्धार्थ महाविद्यालयाला भेट दिली होती. त्या वेळी शां. श. रेगे ग्रंथपाल होते. त्यांच्या निवृत्तीनंतर श्रीकांत तळवलकर यांनी ती आणि इतर साहित्यांचा अनमोल ठेवा जतन करून ठेवला आहे. त्यात बाबासाहेबांच्या स्वाक्षरीची लहान मूळ प्रत आणि एक मोठी प्रत अद्याप महाविद्यालयात आहे.

ऐतिहासिक ग्रंथसंपदा

सिद्धार्थ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ग्रंथ, नोंदवही तसेच त्यावर त्यांनी स्‍वतः केलेल्या स्वाक्षरीही आहेत. अकबराच्या नऊपैकी एका रत्नाचे हस्तलिखित ग्रंथ, शिवाय हिंदीतील कविता व संस्कृत वाक्यांच्या हिंदी अर्थाचे हस्तलिखित जतन करण्यात आले आहे. त्यापैकी अनेक पुस्तके आणि साहित्य महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाला देण्यात आले असून डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन यांनाही अनेक ग्रंथसाहित्य दिल्याचे सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक विजय मोहिते सांगतात.

बाबासाहेबांची अनेक दुर्मिळ पुस्तके आमच्या ग्रंथालयात आहेत. त्यांची हस्तलिखिते, हिंदी काव्य, टाचणे व उतारे संग्रही आहेत. बहुतांश साहित्य शासनाकडे सुपूर्द केले असून त्याचे प्रकाशनही झाले आहे. देश-परदेशातून अभ्यासक संदर्भासाठी महाविद्यालयात येत असतात.

- डॉ. अशोक सुनतकरी, प्राचार्य

संविधानाची मूळ प्रत हा अनमोल ठेवा आहे. तो सुरक्षित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ग्रंथपाल असताना त्याला काचेचे आवरण करण्याची सूचना व्यवस्थापनाकडे केली होती; मात्र दरम्यानच्या काळात ते शक्य झाले नाही.

- श्रीकांत तळवलकर, निवृत्त ग्रंथपाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT