Mumbadevi Temple Area sakal
मुंबई

Mumbai News : मुंबादेवी परिसराचा बदलणार लूक; पालिका तयार करणार आराखडा

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या मुंबादेवी मंदिर आणि परिसराचे नूतनीकरण आणि पुनर्विकास करण्याच्यादृष्टीने निर्णय घेतला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या मुंबादेवी मंदिर आणि परिसराचे नूतनीकरण आणि पुनर्विकास करण्याच्यादृष्टीने निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने तातडीने आराखडा तयार करून विद्यमान आराखड्यात आवश्यक ते बदल करावेत, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकाससंदर्भात नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करून पालिका प्रशासनाना निर्देश देण्यात आले आहेत.

दक्षिण मुंबईतील मुंबादेवी परिसर हा एैतिहासिक विभाग आहे. या परिसराचे नुतनीकरण व पुनर्विकासाबाबत विचार केला जातो आहे. त्यादृष्टीने पालिकेच्या संबंधित अधिका-यांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे.

विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत झालेल्या या बैठकीत ५ एकर पेक्षा मोठा परिसर असलेल्या मुंबादेवी मंदिर परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व लक्षात घेता अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे, मंदिराची स्वच्छता आणि सुशोभीकरण यांना प्राधान्य देणे, रस्त्याचे रुंदीकरण, वाहतूक कोंडी टाळणे, फार मोठ्या आर्थिक उलाढालीचे केंद्र असलेला ३०० वर्षांपासूनचा सोने आणि सराफा बाजार याला आकर्षक नवीन स्वरुप देणे आदींबाबीवर चर्चा झाली.

पुनर्विकासासाठीचा आराखडा करताना परिसरातील मुंबादेवी मंदिर ट्रस्ट, श्री मुंबादेवी दागिना बाजार असोसिएशन, इंडिया बुलीयन ॲड ज्वेलर्स असोसिएशन, कामनाथ मंदिर ट्रस्ट आणि अन्य छोट्या-मोठ्या व्यापारी आस्थापनांना विश्वासात घेतले जावे, असे निर्देशही यावेळी नार्वेकर यांनी पालिका प्रशासनाला दिले असल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीत प्रस्तावित नूतनीकरण कसे असेल यावर सादरीकरण करण्यात आले. बैठकीस पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर, सी-वार्ड चे सहायक आयुक्त उद्धव चंदनशीवे, माजी नगरसेवक जनक संघवी, अभियंता मनिष पडवळ, वास्तुविशारद अविनाश वर्मा, मुंबादेवी ट्रस्टचे चंद्रकांत संघवी, राजीव चोकसी, हेमंत जाधव, दागिने व्यापारी पृथ्वीराज कोठारी, आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT