bhandup sakal
मुंबई

भांडूप : बेस्ट बसचं नियंत्रण सुटून अपघात, एकाचा जागीच मृत्यू

जखमींवर मुलुंड येथील अग्रवाल हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यात आले

जीवन तांबे - सकाळ वृ्त्तसेवा

चेंबूर : भांडूप (bhandup) येथील गाढव नाका परिसरामध्ये बेस्ट चालकाचा (best bus) अचानक बसवरील नियंत्रण सुटल्याने त्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. (mumbai 1 dead, 2 injured in BEST bus mishap in Bhandup)

पुंडलिक भगत (वय 70) असे या मृत्य व्यक्तीचे नांव आहे.रवींद्र प्रकाश तिवारी, मुकेशचंद्र उपाध्याय जखमींची नावे आहे.विक्रोळी या डेपोतील बस क्रमांक 605 आज सकाळी ठीक. 7.15 वाजण्याच्या सुमारास टेंभीपाडा ते भांडुप रेल्वे स्टेशन पश्चिमेकडे जात असताना अशोक केदार चौक या ठिकाणी आली असता मार्ग तोकडा व वळणदार असल्याने बस चालकांचा अचानक बसवरील नियंत्रण सुटले.

त्या अपघातात एका पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले त्यांना पोलिसांनी उपचारा करिता मुलुंड येथील अग्रवाल हॉस्पिटल घेऊन गेले असता डॉक्टरांनी पुंडलिक भगत यांना मृत घोषित केले.

तर जखमींवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. भांडुप पोलीसानी बस चालक बबन आनंदा माने व बस वाहक मनोहर मानसिंग राठोड यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर अपमृत्यू ची नोंद करून पुढील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Live Streaming: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेचे काउंटडाऊन सुरू! कुठे पाहता येणार सामने लाईव्ह? पाहा संपूर्ण डिटेल्स

Koyna Dam : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; पाण्याची आवक घटली, 92.49 टीएमसी साठा

Kia Sorento: फॉर्च्यूनरला टक्कर! कियाची पहिली हायब्रिड SUV 'Sorento' लाँचसाठी तयार; प्री-बुकिंग सुरू!

Marathi Live Updates News: राज ठाकरे यांनी घेतले डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

IND vs SL, Test: भारताची चिंता वाढली! ७ ऑगस्टच्या सामन्याबाबत समोर आली महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT