water sakal
मुंबई

Mumbai : मुंबईत १ जुलैपासून १० टक्के पाणी कपात; तलावांत २६ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - पाऊस लांबल्याने मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सातही तलावांत ६.०८ टक्के म्हणजे पुढील २६ दिवस पुरेस इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्या मान्सून दाखल झाला असला तरी तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडेपर्यंत पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे तलावात पुरेसा पाणीसाठा जमा होईपर्यंत मुंबईत १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय जलविभागाने घेतला आहे.

पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी पाणी कपातीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. १ जुलै पासून पाणी कपात लागू केली जाणार आहे.त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीला संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही तलावातून रोज ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडून दरवर्षी सातही तलाव ऑगस्टपर्यंत ‘ओव्हर फ्लो’ होतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून मान्सून लांबत असल्याने पालिकेचे वर्षाचे पाणी नियोजन विस्कळीत होते.

धरणांनी तळ गाठत असल्याने पालिकेला १० ते १५ टक्के पाणी कपात करून वर्षाच्या पाण्याचे नियोजन करावे लागते. गेल्या वर्षीही पाऊस समाधानकारक पडला नसल्याने पाणीसाठा ११ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे २७ जूनपासून पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र त्यानंतर जुलैच्या सुरूवातीपासून तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने तलावांत पुरेसा पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे दोन आठवड्यांनंतर पालिकेने पाणीकपात मागे घेण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती देतांना पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी सांगितले की,यावेळी पावसाचे आगमन लांबले शिवाय जून च्या शेवटच्या आठवड्यात दाखल झालेल्या पावसाने अद्याप जोर धरलेला नाही. त्यामुळे सध्या २५ दिवसांच्या 'शॉरटेज' आहे.

हा 'शॉरटेज' भरून काढणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला. आता पावसाला सुरुवात झाली असली तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. पुढील १० दिवस जर चांगला पाऊस झाला तर मात्र पाणी कपात मागे घेतली जाईल असे ही आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी या दिवसांमध्ये १० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा होता. यावेळी मात्र पाणीसाठा ६ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पाण्याची 'आणीबाणी' सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या महिन्यातच पाणी कपातीवर विचार सुरू झाला होता.मात्र पाऊस येण्याची शक्यता असल्याने निर्णय घेण्यात आला नाही. मात्र आता पाऊस लांबल्याने आणि तलावांनी तळ गाठल्याने शेवटी हा निर्णय घेण्यात आला.

सध्याचा जलसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

मोडक सागर ३५५५८

तानसा ३६१९०

मध्य वैतरणा १९३३४

भातसा ४७०८

विहार ६९७७

तुळशी २३४२

तीन वर्षांतील २७ जूनची स्थिती

२०२३ १०५१०९ दशलक्ष लिटर

२०२२ १३०८७२ दशलक्ष लिटर

२०२१ २४४२४४ दशलक्ष लिटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT